*भाविकांना लागली विठुरायाच्या दर्शनाची ओढ*
*उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती*
लातूर : माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मोफत पंढरपूर वारी* आषाढी एकादशीला १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता नोंदणीकृत ११४७ भाविक प्रवाशी, ६० स्वयंसेवक, ३ रुग्णवाहिका आणि विक्रमी २२ ट्रॅव्हल्सने पंढरपूरकडे रवाना होतील.याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह माझं लातूर परिवाराचे डॉ. सदानंद कांबळे, आदित्य भुतडा, शाम तोष्णीवाल, उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नोंदणी केलेल्या सर्व ११४७ भाविक प्रवाशांनी सकाळी ठीक ६ वाजता अशोक हॉटेल येथील यशवंतराव चव्हाण संकुल येथे हजर राहावे असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी ६० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ३ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, ४ नर्सिंग स्टाफ अत्यावश्यक औषधांसह ताफ्यात राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सर्व भाविक प्रवाशांना घेऊन वारी परत लातूरकडे निघणार आहे. दरम्यान सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी वेळेवर उपस्थित राहावे, दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी विनंती माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, योगेश शिंदे, काशिनाथ बळवंते, डॉ. सितम सोनवणे, तम्मा पावले, प्रमोद गुडे, संजय स्वामी, अभय मिरजकर, ऍड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दिपरत्न निलंगेकर, ऍड.राहुल मातोळकर,गोविंद हेड्डा, गणेश हेड्डा, अभिजित पिचारे, मच्छिंद्र आमले, विनोद कांबळे, सचिन अंकुलगे, सचिन सोळुंके,प्रा अजय वाघमारे, भास्कर कुंभार, विष्णू साबदे, सुनिल गवळी, रत्नाकर निलंगेकर, राम साळुंके, एस आर काळे, उमेश कांबळे, अमर करकरे परिश्रम घेत आहेत.




