लातूर. – विशाल नगर, येथील साई मंदिरासमोरील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये चिमुकल्यानी आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. प्रथम शाळेच्या आवारात विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विठ्ठल – रुक्मिणी प्रतिमेचे पूजन गजानन कृपा भजनी मंडळाच्या उपाध्यक्षा चंद्रकला तोडकर, श्रीकृष्ण लाटे, शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेच्या शिक्षिका ममता शर्मा यांनी आषाढी एकादशी विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर मुक्तांगणच्या चिमुकल्यांची दिंडी श्री साई मंदिराकडे मार्गस्थ झाली. यावेळी पांडुरंगाची वेशभूषा श्रीवर्धन राहुल इनामे, शौर्य बालाजी शिंदे, रेधांश धनराज सोमवंशी, सात्विक रामदास पांचाळ, शौर्य भैयासाहेब आचार्य, जय नितीन गिर, राघवेंद्र सुरेंद्र चौहान तर रुक्मिणीची वेशभूषा हिंदवी ऋषिकेश गोरे, गौरवी महेश सावंत, आद्या प्रमोद हंगरगे, हृत्वी सचिन मगर, मनुश्री निखील बंडावार, दुर्वा धर्मेंद्रसिंग चौहान, ईरा नितीन बिराजदार, श्रावणी बाबुराव वाघमोडे, वेद्श्री नागेश जोशी यांनी साकारली होती.

शाळेचे विद्यार्थी व शिक्षिका यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली, अवघे गर्जे पंढरपूर, पंढरपुरात काय वाजत गाजत, गेला हरी कुण्या गावा, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला या भजनावर टाळ, मृदंगाच्या निनादात दिंडीचे उत्साहपूर्ण वातावरणात सादरीकरण केले. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अशा विठ्ठल नामाचा गजरात साई मंदिरात दिंडी घेऊन विद्यार्थांनी प्रवेश केला. गजानन कृपा भजनी मंडळाने विठ्ठलाच्या आरतीसह विविध भजन गाऊन विद्यार्थाना प्रोत्हाहीत केले. भजनी मंडळानी साई मंदिरामध्ये गायलेल्या भजनाच्या तालावर विद्यार्थ्यांनी रिंगण खेळून दिंडीचा मनसोक्त आनंद लुटला. विद्यार्थ्यांना व पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका किर्ती पाटील यांनी केले.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

—————————————————————————-




