मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माहूर गडाची माय रेणुका” चे प्रकाशन

0
4

माहूर गडाची माय रेणुका …मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते नागपूर येथे ध्वनिफीत प्रकाशन संपन्न….

नागपूर ;(विशेष प्रतिनिधी )…..संतकवी विष्णुदास रचित आणि संगीतकार आनंदी विकास यांनी संगीत दिलेली “माहूर गडाची माय रेणुका ” ही 21 पदांची स्वरमाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते त्यांचे रामगिरी या निवासस्थानी रसिकार्पण झाली आहे . मुख्यमंत्री फडणवीस यांनी विष्णुकवींचे एवढे मोठे काम कदाचित पहिल्यांदा झाले असावे असे म्हणत या कामाचे आवर्जून कौतुक केले आणि कामाविषयी जाणून घेतले ..

माहूर गडाची माय रेणुका यातील पदांना ज्यांनी आपला स्वर दिला आहे ते मंगेश बोरगांवकर ,सागर जाधव,आदित्य कडतने,योगेश कदम,शेफाली कुलकर्णी,वर्षा जोशी,स्वराली जाधव आणि मुक्ता जोशी …आई जगदंबेने हे काम करून घेतले असे उद्गार संगीतकार आनंदी विकास यांनी या प्रसंगी काढले आणि श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड चे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य होऊच शकले नसते असेही त्या म्हणाल्या.

या पदांचे सर्व काम मिडिया वर्क्स स्टुडिओ पुणे येथे करण्यात आले आहे.संगीत संयोजन प्रथमेश कानडे यांचे असून तांत्रिक बाजू आदित्य विकास आणि प्रसाद पवार यांनी सांभाळली आहे.. नागपूर येथे या सोहळ्यासाठी माहूरचे तहसीलदार श्री अरविंद जगताप ,विश्वस्त चंद्रकांत भोपी ,संजय कन्नव ,विकास देशमुख , व्यंकट मुळजकर ,आदित्य देशमुख ,भार्गवी देशमुख आणि अनंत कुलकर्णी हेउपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here