आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे
उत्तम चव्हाण यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश
लातूर दि.१५– भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेणापूर आणि तालुक्यात होत असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेणापूर शहर युवा अध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
आ. रमेशआप्पा कराड साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेणापुर शहर युवा अध्यक्ष उत्तम चव्हाण, विकास चव्हाण राष्ट्रवादीचे विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष सुरज फुलारी, उत्तम राठोड, आशिष राठोड, नेताजी चव्हाण, बालाजी राठोड, कारभारी चव्हाण, मनोज चक्रे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत करून यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशामध्ये पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशात आणि मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही शासनाच्या माध्यमातून सामान्यांना दिलासा देणाऱ्या त्याचबरोबर गावागावात सर्वांगीण विकासाच्या योजना सुरू केल्या आहेत राज्याचे. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजीं फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात रेणापूर शहर आणि तालुक्याबरोबरच लातूर ग्रामीण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध असून, प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चित न्याय दिला जाईल असे बोलून दाखविले.

भाजपाच्या लातूर येथील संवाद कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश प्रसंगी रेनापुर चे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, रेणापूरचे शहराध्यक्ष दत्ता सरवदे माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, पद्माकर चिंचोलकर, रेणापुरचे माजी सभापती विजय चव्हाण, उज्वल कांबळे, शेख अजीम, सोशल मीडिया जिल्हा संयोजक महेश गाडे, पानगावचे माजी सरपंच सुकेश भंडारे, प्रदीप राठोड, रमेश चव्हाण, अंतराम चव्हाण, लखन आवळे, शिवाजी जाधव, गणेश चव्हाण, दिलीप चव्हाण, पप्पू कुडके, सचिन शिरसकर, नंदकुमार मोटेगावकर, भरत राठोड, रावसाहेब राठोड, शरद जाधव, दिलीप राठोड, दीपक ठाकूर, रावसाहेब राठोड, सचिन लोकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.




