35.6 C
Pune
Saturday, April 4, 2026
Homeआंतरराष्ट्रीय*रिया गायकवाड अमेरिकेच्या विद्यापीठात सिनेट निवडणूकीत प्रचंड मतांनी विजयी*

*रिया गायकवाड अमेरिकेच्या विद्यापीठात सिनेट निवडणूकीत प्रचंड मतांनी विजयी*

न्यूयॉर्क ( विशेष प्रतिनिधी)लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील बफेलो यूनिवर्सिटी मध्ये बॅचलर ऑफ बायोमेडिकल च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत रिया विजयकुमार गायकवाड ही प्रचंड मतानी विजयी झाली आहे. बारा सदस्या साठी निवडणूक झाली होती. या बारा मध्ये भारतीय दोन विद्यार्थी आहेत. त्यात रिया गायकवाड ही निवडून आली आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे कौतुक होत आहे.
लातूर च्या वाले इंग्लिश मीडियम मधे प्राथमिक आणि हायस्कूल चे शिक्षण घेतली असून,वर्गामध्ये नेहमी पाहिली येणारी विद्यार्थीन होती.ती कॉलेज ला शिकत असताना रोटरी च्या माध्यमातून सोशल वर्क केली आहे. काहीतरी वेगळे शिक्षण घेतले पाहिजे म्हणून भविष्यात ज्या शिक्षणाची गरज भासणार आहे असे बायोमेडिकल शिक्षण निवडले आणि जगातली सर्वात चांगली बफेलो यूनिवर्सिटी मधे तिने आपल्या बुद्धिच्या जिवावर प्रवेश मिळवला. आणि लातूर ची मुलगी सात समुद्रापार आपले नेतृत्व आता विद्यापाठाच्या सिनेटवर करणार आहे.


तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. रिया गायकवाड ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चळवळीत काम केलेले आदर्श शिक्षक दादा बळीराम शिवराम गायकवाड यांची नात आणि समृद्धी महामार्ग चे तांत्रिक प्रमुख एमएसआरडीसी चे सह महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड आणि लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आहे.
शिक्षणात ही हुशार आणि नेतृत्वात ही कुशल अशा रिया विजयकुमार गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]