रेणा साखर कारखान्याचे पूजन

0
318

*रेणा साखर कारखाना येथे

दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन*

रेणापूर :– रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीप नगर निवडा यांचे गळीत हंगाम 2021-2022 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू करण्याच्या दृष्टीकोनातून बंद सीजन मध्ये करावयाची कामे युद्धपातळीवर चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि.16/ 8/ 2021 रोजी कारखान्याचे संस्थापक तथा मार्गदर्शक सहकार महर्षी श्री दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते, कारखान्याचे चेअरमन श्री सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख व संचालक मंडळ यांचे उपस्थित मिल रोलरचे विधिवत पूजन करून मिलच्या जोडणी कामास सुरुवात करण्यात आली.

रेणा कारखान्याच्या प्रस्तावित आसवनी प्रकल्प विस्तारीकरण मार्कआऊटचे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या व त्याप्रमाणे कामास सुरुवात करण्यात आली आहे. परम श्रद्धेय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रेणा कारखान्याने दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सभासदांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सतत सहकार्याची भावना ठेवून कारखान्याचे संचालक मंडळ काम करत आहे.

हंगाम सन 2020/2021 मध्ये पाऊस समाधानकारक झाल्यामुळे मांजरा धरणासह इतर प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला, त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये व कार्यक्षेत्र लगत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. उपलब्ध उसाचे विनाविलंब गाळप व्हावे या दृष्टीकोनातून आवश्यक तेवढी तोड वाहतूक यंत्रणा करारबद्ध केली आहे. उपलब्ध ऊस व केलेली पूर्वतयारी यानुसार कारखान्याने गळीत हंगाम 2021/2022 साठी पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कारखान्याने केलेल्या तयारी पाहता नक्कीच कारखाना सदरील उद्दिष्ट पूर्ण करेल व कार्यक्षेत्रातील उपलब्ध उसाचे गाळप करेल व कमीत कमी वेळात आसवणी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल असा विश्वास कारखान्याचे संस्थापक तथा मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी मिल रोलर पूजनचे वेळी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

सदरील कार्यक्रमास लातूर जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी सुळ, कारखान्याचे संचालकव साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,

माजी चेअरमन श्री यशवंतराव पाटील, ज्येष्ठ संचालक मा आ.श्री त्र्यंबकराव भिसे, धनराज देशमुख, संजय हरिदास, संगम माटेकर, अनिल कुटवाड,प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे, संचालिका सौ वैशालीताई माने, अमृता ताई देशमुख, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही मोरे सचिव आर. बी.बरमदे,के. चिफ अकाऊंटंट के. पी.आकुसकर, चिफ केमिस्ट एस आर मोरे,मुख्य शेतकी अधिकारी एस एस भोसले, डिस्टलरी इन्चार्ज डी. बी. देशमुख, कोजन इंजिनियर एस एम उरगुंडे, सिव्हिल इंजिनिअर अमित काकडे,कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here