23.6 C
Pune
Wednesday, June 24, 2026
Home ठळक बातम्या *रेल्वे मार्ग मंजूर करण्याची मागणी*

*रेल्वे मार्ग मंजूर करण्याची मागणी*

0
431

नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा

रेल्वे संघर्ष कृती समितीची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

लातूर/दि.24
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा,मंजुरीच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे हे आज लातूर दौऱ्यावर होते.त्यामुळे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने आज एक शिष्टमंडळ येथे आले होते.या वेळी ना. रावसाहेब दानवे यांची भेट घेवून या नवीन मार्गाच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
हा नवीन मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे.या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे.नांदेड व लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वपूर्ण असून आता नव्याने या मार्गासाठी निधीची तरतूद करून नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून घ्यावा असे निवेदनात विनंती केली आहे.

या वेळी रेल्वे राज्यमंत्री यांनी या प्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे अश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळात माजी मंत्री विनायकराव पाटील,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,पत्रकार अजय भालेराव,भीमराव कांबळे,धनराज कांबळे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]