23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसामाजिक*रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने जयपूर फूट वितरण*

*रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने जयपूर फूट वितरण*

लातूर : लातूर येथे रोटरी क्लब लातूर सेंट्रल व रत्ननिधी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट वितरण कार्यक्रम वीरशैव भवन   या ठिकाणी नुकताच  संपन्न झाला. यामध्ये २६०  लाभार्थ्यांना  कृत्रिम अवयवचे वाटप करण्यात आले. 

 या कार्यक्रमाच्या वितरण समारंभाप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून  दयानंद शिक्षण संस्थेचे  सचिव रमेश  बियाणी,  लातूरचे शिक्षणाधिकारी  नागेश मापारी ,वीरशैव सभा लातूरचे उमाकांत  कोरे, उद्योजक अशोक  लोया, रत्ननिधी ट्रस्टच्या पीआरओ नंदा ठाकर मॅडम,   रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष हेमंत रामढवे,  सचिव बाळासाहेब खैरे,  माजी अध्यक्ष राजगोपाल मुंदडा,  या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र  सुराणा, सह चेअरमन पुष्कराज खुब्बा, रोटरीचे चार्टर्ड  प्रेसिडेंट संजय बोरा,  समन्वयक मेघराज बरबडे  तसेच रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक हेमंत रामढ़वे  यांनी केले.

प्रास्तविकात  त्यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रोजेक्टबद्दल माहिती राजेंद्र सुराणा यांनी दिली. सूत्रसंचलन पुष्कराज ख़ुब्बा यांनी केले.  समारोप प्रसंगी डीजीएन स्वाती हेरकर,  डॉ जितेंद्र पाठक,   दीपक बागडे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे    आभार प्रदर्शन बालासाहेब खैरे यांनी केले. या वेळी पुरूषोत्तम सोनी , मेहुल कामदार ,  गिरीश ब्याळे ,विश्वनाथ पंचाक्षरी , विनोद पंडगे  , अजय तापडिया , रवींद्र चामले , भालचंद्र थळकरी , अॅड विनय मिरकले ,  चंद्रहास मेटे , जितेंद्र कोरे , गिरीश गारठे , अॅड नंदकिशोर लोया ,  उध्दव बडगीरे , सुदर्शन कांबळे , पुरुषोत्तम नौगजा , चंद्रकांत गुंडरे , लक्ष्मीकांत गौड , विजयकुमार धाकपाडे , मन्मथ  पोपडे , श्याम बरुरे ,  अनुसया गरड  , संजय मुंदडा  , संजय बावगे , शेखर मराठे , नागेश स्वामी,  सोमेश कन्नाव , आदि शास्त्री , रोहन मुंदड़ा आदींची उपस्थिती होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]