*रोटरी कॉप्स लातूर, रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्र व रोटरी परिवार यांच्यावतीने पुरग्रस्तांना ‘रोटरी आधार सहाय्यता शिधा किट्स’ वाटप*
*सणासुदीच्या काळात रोटरी परिवाराच्या शिधा किट्स वाटपाने पुरग्रस्तांची दिवाळी झाली गोड*
लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरात पाणी शिरुन संसारउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला अशा वेळी लातूर शहरातील रोटरी कॉप्स लातूर, रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्राच्या अध्यक्षा रो. डॉ. माया कुलकर्णी यांनी पुढाकार घेत पुरग्रस्त नागरिकांसाठी ‘रोटरी आधार सहाय्यता शिधा किट्स’चे वाटप करुन दिपावली सण साजरा करण्यासाठी मदत केली.

या मदतीमुळै व त्यांच्या सोबत केलेल्या संवादामुळे पुरग्रस्त नागरिकांना मोठा आधार मिळाला. रोटरी परिवाराकडून नेहमीच मोठ्याप्रमाणात समाज कार्य करण्यात येते. समाजातील वंचीत घटकांसाठी रोटरीचे सदस्य पुढाकार घेऊन कार्य करतात.

मागील काळात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरात सण साजरा करण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही याची जाणीव ठेऊन रोटरी कॉप्स रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्र व रोटरी परिवारच्या माध्यमातून कॉप्स व रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्राच्या अध्यक्षा रो. डॉ. माया कुलकर्णी, सचिव रो. डॉ. गुणवंत बिरादार, लातूर रोटरी कल्बचे अध्यक्ष रो. झाकी कायमखानी, मिडटाऊनचे अध्यक्ष रो. अमोल दाडगे, मेट्रोचे अध्यक्ष रो. राहूल धरणे, सेंट्रलचे अध्यक्ष रो. बाळासाहेब खैरे, होरायझन चे अध्यक्ष रो. डॉ. गुणवंत बिरादार, श्रेयश चे अध्यक्ष रो. शिवराज मिसाळ यांनी पुरग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड व आनंदी व्हावी यासाठी खारीचा वाटा उचलत रोटरी आधार सहाय्यता शिधा किट्स वाटप उपक्रम होती घेतला.

या उपक्रमा अंतर्गत हरवाडी, मळवटी, खुलगापूर व बोपला गावातील पुरग्रस्त नागरिकांना शिधा किट्स, चटई व रजईचे वाटप करण्यात आले. या शिधा किट्सच्या वाटपाच्या वेळी पुरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. रोटरीच्या या उपक्रमामुळे पुरग्रस्त नागरिकांना त्यांच्या सणाच्या वेळी निश्चितपणे आधार मिळाला आहे. रोटरी कॉप्स लातूर, रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्र व रोटरी परिवार यांच्या या उपक्रमाचे पुरग्रस्त नागरिकांनी आभार मानले.

रोटरीच्या या उपक्रमामुळे पुरग्रस्त नागरिकांच्या जीवनात एक नवीन आशा व उमेद निर्माण झाली आहे.या प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरिप्रसाद सोमाणी, डॉ. सुचित्रा भालचंद्र, डॉ. भास्करराव पाटील, डॉ. भास्करराव बोरगावकर, प्रेसिडेंट रोटरी क्लब श्रेयस रो. शिवराज मिसाळ, सेक्रेटरी रो. उषा शिंदे, रो. प्रकाश निला, रो, रजनी वैद्य, रो. ज्योती मंगलगे, प्रेसिडेंट रोटरी क्लब लातूर मिडटाउन रो. अमोल दाडगे, रो. नागनाथ कलवले, रो. शशिकांत चलवाड, रो. डॉ विश्वास कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी, खुलगापूरचे सरपंच रणखांब हरवाडीचे सरपंच माने, बोपलाचे सरपंच अरुण पाटील, अनंत सांडूर रोटरी कॉप्स लातूरचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.





