22.9 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeउद्योगलक्ष्मी अर्बन बँकेला “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार प्रदान

लक्ष्मी अर्बन बँकेला “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार प्रदान


लातूर येथील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि. या बँकेला “ बँको ब्ल्यू रिबन “ पुरस्काराने लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

लातूर :- मराठवाड्यातील नामांकित नागरी बँकांपैकी असलेली लातूर येथील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि; लातूर या बँकेला “ बँको ब्ल्यू रिबन “ पुरस्काराने दि. ०२ जून २०२२ रोजी लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले.
मागील काळात बँकेने आर.बी.आय.च्या सर्व नियमांचे पालन करत सी.बी.एस. प्रणालीद्वारे आपल्या आठही शाखांमधून ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा दिली आहे. अत्याधुनिक सेवासुविधा या कार्याबद्दल देशातील नागरी सहकारी बँकेच्या १२५ ते १५० कोटी रुपये ठेवी गटातून बँकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. अविज पब्लिकेशन्स तर्फे लोणावळा येथे झालेल्या कार्यक्रमात आर.बी.आय. चे सी.जी.एम. डी.जी.काळे, गॅलेक्सी इन्मा पुणे चे संचालक अशोक नाईक, चीफ एडीटर अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लक्ष्मी अर्बन बँकेला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले आहेत, बँकेच्या रोप्यमहोत्सवी वर्षात “ बँको ब्ल्यू रिबन “ पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. मागील काळात बँकेने आर्थिक व समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. बँकेने प्रधानमंत्री आवास योजना, अटल पेंशन योजना, BBPS, FASTag इत्यादी प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सुरु केल्या आहेत. चालू वर्षात बँक मोबाईल बँकिंग, IMPS, UPI,ATM कार्ड ची सुविधा सुरु करत आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीत बँकेचे सभासद, ग्राहक, शेतकरी, कामगार,कर्जदार, कर्मचारी वर्ग व संचालक मंडळाचे मोठे योगदान आहे.


बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धुत यांनी सर्व संचालक,कर्मचारी तसेच हितचिंतक व ग्राहकांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांचे अमूल्य सहकार्य मिळाले म्हणूनच बँकेस पुरस्कार मिळाला आहे, अशी भावना व्यक्त केली.“बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या नावलौकिकात भर पडली आहे, येणाऱ्या काळात बँकेकडून अधिक चांगल्याप्रकारे अत्याधुनिक सुविधा देण्याचा बँकेचा संकल्प आहे” अशी भावना बँकेच्या संचालक मंडळातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]