25.6 C
Pune
Monday, March 23, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडीलग्नसोहळ्यात आहेर म्हणून वाटले पाचशे पेक्षा अधिक सार्थ ज्ञानेश्वरी व हरिपाठ

लग्नसोहळ्यात आहेर म्हणून वाटले पाचशे पेक्षा अधिक सार्थ ज्ञानेश्वरी व हरिपाठ


सीमाभागातील मराठीप्रेमी शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम”

हलसी (तु .कर्नाटक)- लग्न सोहळा म्हंटले की आहेर आणि भेटवस्तू देण्याची प्रथा रूढ झाली आहे. कोणी साड्या, कोणी भांडे तर कोणी काही गिफ्ट भेट म्हणून देत असतो. मात्र हलसी (तु) येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवाजीराव आडबाळे गुरुजी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात आहेर म्हणून सार्थ ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाची ग्रंथरूपी भेट पाहुण्यांना दिलेली आहे. ज्ञानेश्वरी हा मराठीतला वारकरी संप्रदायाचा सर्व परिचित ग्रंथ आहे. सीमाभागात मराठी भाषेला बळ मिळावे या उद्देशाने आडबाळे गुरुजींनी सुमारे 500 पेक्षा अधिक सार्थ ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाचे वाटप आहेर म्हणून केलेले आहे. त्यांचे हे कार्य मराठी भाषेच्या प्रसारासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रत्येक जण देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सीमाभागात प्रचंड कौतुक होत आहे.
यासंबंधात विचारले असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलसी (तु) चे मुख्याध्यापक श्री शिवराज गोस्वामी म्हणाले की हा पहिलाच उपक्रम असून अशा प्रकारच्या ग्रंथ प्रसाराचे आणि संस्कृतिक परंपरा जोपासण्याचे कार्य प्रत्येकाने करावे विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून सरांनी खऱ्या अर्थाने सार्थ भेट दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]