पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचे भवितव्य सुरक्षीत ः आ.संभाजी पाटील निलंगेकर
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स महाविद्यालयातून लसीकरणाचा शुभारंभ
लातूर ः सशक्त व सुदृढ भारत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने विविध उपक्रम आणि योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अंमलात आणलेल्या आहेत. जगभरात कोरोनाचे संकट असतांना भारताने कोरोनाचा मुकाबला अतीशय यशस्वीपणे करून सर्वात प्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसीत केली. यामुळे देशातील अनेक नागरीक कोरोनापासून वंचीत राहिलेले असून आता पंतप्रधान मोदी यांनी पंधरा ते आठरा वयोगटातील तरूणांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्याची घोषणा केली. या घोषणेच्या माध्यमातून भारताचे भवितव्य सुरक्षीत राहणार असून मराठवाड्यात सर्वात प्रथम रिलायन्स महाविद्यालयाने हि मोहिम सुरू करून लातूर पॅटर्नमध्ये भर टाकला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरीकांसह देशातील तरूणांचाही कोरोनापासून बचाव व्हावा आणि भारताचे भवितव्य सुरक्षीत राहावे याकरिता 15 ते 18 वयोगटातील तरूणांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्याची घोषणा केली. ही मोहिम आज दि.3 जानेवारी पासून सुरू झालेली असून मराठवाड्यात सर्वात प्रथम रिलायन्स महाविद्यालयाने या लसीकरणाचा शुभरंभ केला आहे. सदर शुभारंभ माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला असुन यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत होनराव, कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव, कार्यकारी संचालक ओमकार होनराव यांच्यासह शहर जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, नगरसेविका सौ.शोभा पाटील, प्राचार्या सौ.सुलक्षणा केवळराम आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण जगाला भेडसावणार्या कोरोना संसर्गाचा मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने अतीशय चांगल्या पध्दतीने केलेला असून कोरोनाला हरवण्याकरिता त्यांच्या नेतृत्वात सर्वात प्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसीत करण्यात आल्याचे सांगुन माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केवळ पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होवू नये याकरिता आवश्यक असणारी लस भारताने विकसीत करून ती भारतासह इतर देशांना पुरविण्याचा मानही मिळविलेला आहे. सध्या कोरोनाच्या तीसर्या लाटेची भिती व्यक्त करण्यात येत असून या लाटेत देशाचे उद्याचे भवितव्य असणारे विद्यार्थी व तरूण सुरक्षीत राहावे याकरिता त्यांनी 15 ते 18 वयोगटातील तरूणांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्याची घोषणा केली. या मोहिमेची सुरूवात आज दि.3 जानेवारी रोजीपासून संपूर्ण देशभरात सुरू झालेली आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभरात निर्माण करणार्या लातूरात ही मोहिम रिलायन्स महाविद्यालयाने सर्वात प्रथम सुरू करून लातूर पॅटर्नमध्ये भरच टाकले असल्याचे गौरवोद्गार आ.निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
आगामी काळात रिलायन्स महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह तरूणांकरिता हे केंद्र खुले करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोरोनाच्या मागील संसर्ग काळातही रिलायन्स महाविद्यालयाने कोवीड सेंटर सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासत रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा समजुन काम केले असल्याबद्दल रिलायन्स महाविद्यालय व होनराव परिवाराचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव यांनी आगामी सहा दिवसामध्ये विद्यार्थ्यांसाठी 2500 लस पुर्ण करण्याचे उद्दिष्ट पुढील टप्प्यात शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थी व तरूणांचे लसीकरण करण्यासाठी हे केंद्र खुले करण्यात येईल अशी माहिती सांगितली.
सदर कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीत 50 जणांच्या उपस्थितीतच करण्यात आला. यावेळी शहर जिल्हा भाजपाचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे शिक्षक यांच्यासह कर्मचार्यांची उपस्थिती होती.











