32.9 C
Pune
Wednesday, April 1, 2026
Homeराजकीयलातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्या -निलंगेकर

लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्या -निलंगेकर

लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्या

माजी मंत्री आ. निलंगेकरांचे भाजप नगरसेवकांना आवाहन

लातूर/प्रतिनिधी:- लातूर महानगर पालिकेच्या निवडणूकीत विकासाचा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर गेलो होतो. मात्र काँग्रेसने नेहमीप्रमाने मतदारांची दिशाभुल करत भावनेचे राजकारण केले. परिणामी लातूरने आपल्याला कौल दिलेला नसला तरी लातूरच्या विकासाची भुमिका आगामी काळात निवडूण आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात ठामपणे मांडावी अशी अपेक्षा व्यक्त करत लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपच्या नवनिवार्चीत नगरसेवकांना केले.

लातूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात नवनिवार्चीत नगरसेवकांची बैठक पार पडली. या प्रसंगी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे व आगामी काळात सरकारच्या मदतीने करण्यात येणारा लातूरचा विकास हिच भुमिका घेऊन आपण सर्वजण महानगरपालिका निवडणूकीला सामोरे गेलो होतो असे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले की, काँग्रेसने याउलट मतदारांची दिशाभूल करत भावनेचे राजकारण केले. अखेर विकासावर भावनेचा विजय झाला असून या निवडणूकीत आपण जे यश मिळाविले आहे ते यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आगामी काळात निवडूण आलेल्या 22 नगरसेवकांनी एकदिलाने व एकजुटीने सभागृहात काम करत लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्यावे असे स्पष्ट केले. या 22 नगरसेवकांना संपूर्ण शहराचे प्रश्न सभागृहात मांडायचे असून सत्ताधार्‍यांना वेळप्रसंगी जाब विचारण्याची भुमिकाही घ्यावी लागेल असे सांगितले. त्याचबरोबर सत्तेचे पहारेकरी आणि विकासाचे रखवलदार अशी भुमिका आगामी काळात पार पाडत पुढील विधानसभा निवडणूकीचा विजय हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले. नगरसेवकांच्या पाठिशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही देऊन लातूरच्या विकासासाठी आवश्वक असणारा निधी प्राप्त करून घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वासही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला.

महापालिका निवडणूकीत उमेदवार असलेल्या प्रत्येकांने जीवाचे रान करत निवडणूकीला सामोरे गेले असल्याचे सांगत डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, ज्यांना यश मिळाले त्यांचेही आणि जे जिद्दीने लढले त्यांचेही अभिनंदन केले. आता निवडूण आलेल्या 22 नगरसेवकांच्या खांद्यावर 70 जणांचे ओझे असून या 22 जणांनी शहराच्या प्रत्येक भागातील समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यााठी सभागृहात खंबीरपणे ठोस भुमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवकांच्या पाठिशी आम्ही सर्वजन असलो तरी आपण आता लातूरच्या जनतेसाठी कायम सतर्क राहावे असे आवाहन डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी यावेळी केले.

नवनिवार्चीत भाजपच्या 22 नगरसेवकांना आता लातूरकरांची भुमिका सभागृहात तर मांडायची आहेच मात्र त्यासोबत पक्षाची विचारधारा शहराच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्याची भुमिका पार पाडावी लागणार असल्याचे सांगून शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, काँग्रेसने मतदारांची दिशाभूल करत हि निवडणूक जिंकलेली आहे आगामी काळात काँग्रेसचा हा खोटारडेपणा लातूरकरांसमोर आणण्याचे कामही नगरसेवकांच्या माध्यमातून पक्ष करेल असा विश्वास व्यक्त केला. या 22 नगरसेवकांनी पक्षाची भुमिका आणि पक्षाचे आदेश डोळ्यासमोर ठेऊनच वाटचाल करणे अपेक्षीत असून पक्षही पुर्ण ताकदीने नगरसेवकांच्या पाठिशी असेल अशी ग्वाही दिली.

या बैठकीला शहर जिल्हा सरचिटणीस संजय गिर, निखील गायकवाड, रागिणी यादव, प्रविण कस्तुरे यांच्यासह युवा मोचार्चे जिल्हाध्यक्ष ओम धरणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शितल मालू आदींसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.चौकटगटनेता निवडीचे अधिकार प्रदेशाकडेभाजपच्या वतीने निवडूण आलेल्या नवनिवार्चीत 22 नगरसेवकांचा पुर्ण बायोडाटा पक्षाकडे असल्याचे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले की, ज्या पद्धतीने उमेदवार निवडीचे अधिकार प्रदेशाकडे होते त्याच पद्धतीने आता गटनेता निवडीचा अधिकार सुद्धा प्रदेशाकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे गटनेता कोण होईल हे सांगणे आता शक्य नाही. मात्र गटनेता निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्षाच्या सहीने लवकरच प्राप्त होईल असेही स्पष्ट केले.अभिनंदनाचा ठरावराज्यातील महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घवघवीत यश प्राप्त करत भाजपाने प्रथम स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे महसुलमंत्री तथा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर महानगरपालिका निवडणूकीत शहर भाजपाला मोठी ताकद दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. त्याच बरोबर लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी स्वत: उमेदवारी न घेता कार्यकर्त्यांना प्राधान्य देवून शहरभरात प्रचाराची धूरा समर्थपणे सांभाळली होती. याबद्दल शहर जिल्हा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]