27.5 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeआरोग्य वार्ता*लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. अशोक पोद्दार*

*लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. अशोक पोद्दार*

लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनचा पदग्रहण सोहळा थाटात 

  अध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार; सचिव डॉ.संतोष माळी 

लातूर (वृत्तसेवा)-: महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनचा पदग्रहण सोहळा हॉटेल कार्निव्हल रिसॉर्टमध्ये रविवारी ( दि. २ जून ) थाटात पार पडला. असो.चे नूतन अध्यक्ष म्हणून  डॉ. अशोक पोद्दार; सचिव डॉ.संतोष माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पदभार स्विकारला . 

या पदग्रहण सोहळ्यास पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे  ख्यातनाम अस्थिशल्य  चिकित्सक डॉ. पराग संचेती, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कोठाडिया, कार्यकारिणी  सदस्य  डॉ. राहुल पंडित , डॉ. देवेंद्र  पालीवाल,  एमसीआय चे माजी सदस्य तथा सीपीएस मुंबईचे माजी अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर , विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. उमॆश कानडे, माजी अध्यक्ष डॉ. द्वारकादास तापडिया, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. गिरीश कोरे, डॉ. शशिकांत कुकाले    आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत लातूर ऑर्थोपेडिक असो.च्या  पुढीलप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांनी  पदभार स्वीकारला. अध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, सचिव डॉ.संतोष माळी ,उपाध्यक्ष डॉ. चेतन जाजू, डॉ. रणजित हाके पाटील,  सहसचिव डॉ. तुषार पिंपळे, डॉ. रोहन अकोसकर, कोषाध्यक्ष डॉ. मन्सूर भोसगे ,अकॅडमिक को- ऑर्डिनेटर्स  डॉ.आशिष चलवदे, डॉ. शशिकांत कुकाले, डॉ. निलेश देशमुख, डॉ. विक्रम सूर्यवंशी, डिजिटल अँड मिडिया  को- ऑर्डिनेटर डॉ. किरण गोजमगुंडे, डॉ. श्रीनिवास संदीकर, डॉ. मधुसूदन बियाणी,  डॉ.अतुल उरगुंडे, एमएमसी / एमओए  को- ऑर्डिनेटर  डॉ. खालेद काझी, डॉ. हनुमंत चांडक, डॉ. हृषिकेश  नळवदे, डॉ. इमरान  कुरेशी, पॅट्रॉन्स  डॉ. डी.जी. देशपांडे, डॉ. श्रीकांत गोरे,  डॉ. जी.ए. हाजगुडे, डॉ. आर.जी. मालू, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. सतीश देशमुख, डॉ. राजकुमार दाताळ , उदगीर प्रतिनिधी डॉ. श्रीनिवास बलशेटवार , डॉ.अजय महिंद्रकर, अहमदपूर प्रतिनिधी डॉ. वैभव  रेड्डी, डॉ. सुनील चलवदे,  निलंगा प्रतिनिधी डॉ. तात्यासाहेब देशमुख, अंबाजोगाई प्रतिनिधी  डॉ. दीपक लामतुरे, डॉ. निलेश तोष्णीवाल, उमरगा प्रतिनिधी  डॉ. राजकुमार कानडे, डॉ. सचिन विश्वेकर. या पदाधिकाऱ्यांनी डॉ. पराग संचेती यांच्यासमोर ‘  मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, मी संघटनेची तत्वे कसोशीने पाळीन. संघटनेचे हित माझ्यासाठी सर्वोच्च राहील. घटनेमध्ये दिलेल्या मी करावयाच्या सर्व कामांची मी माहिती करून घेईन. संघटनेच्या कामकाजासंबंधित आवश्यक ती  मला प्राप्त होणाऱ्या सर्व  माहिती, ज्ञान व कागदपत्रांबाबत मी गुप्तता बाळगेन . मी संघटना व तिचे सदस्य यांच्या भल्यासाठी सतत कार्यरत राहीन’, अशी शपथ घेतली. 

              यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. पराग संचेती यांनी ऑर्थोपेडिक असो.च्या आपल्या ३३ वर्षांच्या  प्रदीर्घ कार्यकाळात एवढा उत्कृष्ट पदग्रहण सोहळा कधीच पाहिला  नसल्याचे सांगितले. लातूर ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनचे कार्य अत्यंत नेत्रदीपक व उल्लेखनिय  होणार आहे, याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. डॉ. कोठाडिया यांनी डॉ. पोद्दार व त्यांच्या नूतन सहकाऱ्यांचे अभिनंदन करून लातूरला मराठवाडा पातळीवरील विभागीय परिषद आयोजित करा, आपण त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. डॉ. राहुल पंडित , डॉ. उमेश कानडे,  डॉ. गिरीश मैंदरकर , डॉ. उदय मोहिते यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने लातूर ऑर्थोपेडिक असो.च्या यशाचा आलेख आपण पुढील काळातही असाच चढता कसा राहील यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. यासाठी ऑर्थोपेडिक क्षेत्रातील आपला २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव नक्कीच कामी येणार असल्याचे सांगून डॉ. पोद्दार यांनी पुढीलवर्षी आपण विविध सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणार आहोत तसेच यावर्षीपासून  स्व. डॉ. जगदीश अग्रोया व स्व. डॉ. रामेश्वर कांदे  यांच्या स्मरणार्थ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  अवॉर्ड देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लातूर ऑर्थोपेडिक असो.चे काम जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही डॉ. पोद्दार यांनी सांगितले.  त्यासोबतच सीएमई च्या आयोजनावर भर देणार आहोत. याकरिता आपल्याला सर्वांची भक्कम साथ मिळेल असा विश्वासही डॉ. पोद्दार यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. संतोष माळी यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी असो.च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मागच्या वर्षी असो.च्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती डॉ. द्वारकादास तापडिया यांनी दिली. डॉ. अशोक पोद्दार यांच्या या निवडीबद्दल राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, वैशालीताई देशमुख, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, समस्त जैन समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तुषार पिंपळे, डॉ. रोहन अकोसकर यांनी तर आभार प्रदर्शन  डॉ. चेतन जाजू  यांनी केले. 

कार्यक्रमास डॉ. डी.जी. देशपांडे, डॉ. राजेंद्र मालू, डॉ. अरुण राव, डॉ. दीपक गुगळे, डॉ. शिवाजी काळंगे, डॉ.सतीश बिराजदार, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. चेतन सारडा, जितेश बजाज यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. 

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]