*लातूर-तिरुपती रेल्वे लवकरच*

0
550

लातूर-तिरूपती रेल्वेसेवा लवकरच

निजाम शेख यांच्या मागणीनंतर मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांचे आश्वासन

लातूर/प्रतिनिधी:लातूरसह शेजारील जिल्हे व मराठवाड्यातील भक्तांसाठी महत्त्वाची असणारी लातूर ते तिरुपती रेल्वेसेवा सुरू करावी,अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र – मध्यप्रदेश – कर्नाटक झोनल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्याला तात्काळ प्रतिसाद देत लाहोटी यांनी ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. यामुळे भक्तांची मोठी सोय होणार आहे.


लातूरसह मराठवाड्यातून तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. परंतु थेट रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होते.ती टाळण्यासाठी लातूरहून तिरुपती रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निजाम शेख यांनी यापूर्वीही केली होती. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी शुक्रवारी (दि.१७ )लातूरच्या दौऱ्यावर आले होते.त्यावेळी निजाम शेख यांनी लाहोटी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.बिदर-मुंबई गाडी ३६ तास मुंबईत थांबून असते.परत आल्यानंतर पुन्हा ३६ तास ती उभी असते.ही गाडी थेट तिरुपती पर्यंत सोडता येऊ शकते.
पुणे-लातूर-खानापुर- हुमनाबाद-गुलबर्गा-वाडी- गुलकंद यामार्गे ही रेल्वे तिरुपती येथे जाऊ शकते. दररोज दीड ते दोन हजार नागरिकांना या गाडीचा लाभ होवू शकतो,अशी माहिती निजाम शेख यांनी महाप्रबंधकांना दिली.अनेक दिवसांपासून असणारी मागणी आणि या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता लाहोटी यांनी लवकरात लवकर ही रेल्वे सुरू करू असे आश्वासन निजाम शेख यांना दिले.यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांची व भक्तांची अनेक दिवसांपासून असणारी मागणी पूर्णत्वास जाणार आहे.
परळी – पुणे – मुंबई गाडी सुरू करावी.अकोला-परळी -लातूर मार्गे नागपूर-गोवा ही गाडी सुरू करावी.हैदराबाद -हडपसर ही गाडी पनवेल पर्यंत वाढवावी.कोल्हापूर- बिदर गाडीचा हैदराबाद पर्यंत विस्तार करावा.इंदोर-दौंड या गाडीला लातूर पर्यंत पाठवावे.लातूर-अजमेर साप्ताहिक रेल्वे सुरू करावी. लातूर-मुंबई रेल्वेला ६बोगी वाढवाव्यात,यासह इतरही मागण्या निजाम शेख यांनी या निवेदनात केल्या आहेत. या संदर्भातही सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन महाप्रबंधकांनी यावेळी दिल्याचे निजाम शेख यांनी सांगितले.
यावेळी सोलापुरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे,श्रेयांश चिंचवड़े, मंडल सुरक्षा आयुक्त,आर पी एफ सोलापूर श्रेयांश चिंचवडे,लातूर येथील बी.के. तिवारी,फाजील शेख,शेखर गोखले,अविनाश बनसोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here