Homeराजकीयलातूर विभागीय अपर विभागीय आयुक्तालय निर्मितीचा निर्णय संकल्पित -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लातूर विभागीय अपर विभागीय आयुक्तालय निर्मितीचा निर्णय संकल्पित -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लातूर विभागीय अपर विभागीय आयुक्तालय निर्मितीचा निर्णय संकल्पित महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार अभिमन्यू पवार यांना लेखी माहिती

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पुनर्रचनेच्या मागणीला शासनस्तरावर दिशा

लातूर : छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाची विभागणी करून लातूर येथे स्वतंत्र विभागीय आयुक्त कार्यालय अथवा लातूर व नांदेड येथे स्वतंत्र अपर विभागीय आयुक्त कार्यालये स्थापन करण्याच्या मागणीला शासनस्तरावर सकारात्मक दिशा मिळाली आहे. सर्वंकष बाबींचा विचार करून ‘लातूर विभागीय/अपर विभागीय आयुक्त कार्यालय’ निर्मितीचा निर्णय घेणे संकल्पित असल्याची लेखी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना दिली आहे.

लातूर व नांदेड येथे स्वतंत्र विभागीय अथवा अपर विभागीय आयुक्त कार्यालये स्थापन करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच मागील पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला होता

.लातूर व नांदेड येथे स्वतंत्र विभागीय अथवा अपर विभागीय आयुक्त कार्यालये स्थापन करणे हा धोरणात्मक विषय असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आवर्ती व अनावर्ती खर्चासह प्रशासकीय पुनर्रचनेची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वंकष बाबींचा विचार करून लातूर विभागीय/अपर विभागीय आयुक्त कार्यालय निर्मितीचा निर्णय घेणे संकल्पित असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा विषय शासनाच्या विचाराधीन असून, प्रशासकीय पातळीवर त्याबाबत पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित होत असल्याचे दिसून येत आहे.

याच विषयासंदर्भात काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी संयुक्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. लातूर व नांदेड या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र विभागीय अथवा अपर विभागीय आयुक्त कार्यालये स्थापन करून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागणीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.लातूर व नांदेड या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र विभागीय किंवा अपर विभागीय आयुक्त कार्यालयांचा पर्याय पुढे आला आहे. महसूलमंत्र्यांचे लेखी पत्र, या पर्यायाबाबत दोन्ही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली स्वीकृती आणि शासनस्तरावर झालेल्या चर्चेमुळे या मागणीला पुढील काळात अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लातूर विभागीय/अपर विभागीय आयुक्त कार्यालय निर्मितीचा विषय लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत या विषयाचा शासनस्तरावर निरंतर पाठपुरावा सुरूच ठेवणार असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments