लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त सुरू होत आहे एक अभिनव उपक्रम… होय, 16 ऑगस्ट अर्थात आपल्या लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनी ऐतिहासिक गंजगोलाई येथून ‘लातूर हेरिटेज वॉक’ या नवीन उपक्रमाला सुरूवात होत आहे… लातूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वारसा स्थळांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या माध्यमातून वारसा स्थळांचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी नागरीक आणि लातूर जिल्हा प्रशासानाच्यावतीने ‘लातूर हेरिटेज वॉक’ सुरू करण्यात येत आहे… उद्या, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता गंजगोलाई येथून या उपक्रमाला सुरूवात होत आहे… यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी हनुमान चौक येथे एकत्र येण्याचे आवाहन कारण्यात आले आहे…
चला तर मग… इतिहास जाणून घेऊया, वारसा जपूया !!




