22.8 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeठळक बातम्यालातूरात 'लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप'चे आयोजन

लातूरात ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप’चे आयोजन


जिल्ह्यात रंगणार भव्य क्रिकेट स्पर्धा; प्रथम येणाऱ्या संघास 1 लाख रुपयांचे पारितोषिक 

लातूर : आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी आता ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 13 ते 26 मे 2022 या कालावधीत तालुका व जिल्हास्तरावर ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी जिल्ह्यातील क्रिकेट संघांना 12 मे 2022 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप संयोजन समितीच्या वतीने ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.

सुरवातीला लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही स्पर्धा होणार आहे. तालुकास्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51,000 रुपयांचे तर द्वितीय पारितोषिक 31,000 रुपयांचे दिले जाणार आहे. शिवाय, मालिकावीर (5,000 रुपये), उत्कृष्ट फलंदाज (3,100 रुपये) व उत्कृष्ट गोलंदाज (3,100 रुपये) अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.


तालुकास्तरावरील स्पर्धेत प्रथम आलेल्या संघांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या संघास 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. द्वितीय पारितोषिक हे 51,000 तर तृतीय पारितोषिक 31,000 रुपयांचे दिले जाणार आहे. यासोबतच मालिकावीर (3,100 रुपये), उत्कृष्ट फलंदाज (2,100 रुपये), उत्कृष्ट गोलंदाज (2,100 रुपये) अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना 501 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. जिल्हास्तरीय सामना हा 10 षटकाचा व तालुकास्तरीय सामना 8 षटकाचा राहील. स्पर्धेसाठी बॉल संयोजकाकडून घ्यावा लागेल. एक खेळाडू एकाच संघाकडून खेळेल. सर्व संघाना आपली 15 जणांची यादी सुरुवातीला द्यावी लागेल. त्यानंतर त्यात बदल केला जाणार नाही. गैरवर्तन केल्यास संघ बाद करण्याचा अधिकार संयोजकांना राहील. पंचाचे निर्णय अंतिम राहतील. तसेच तालुकास्तरावरील क्रिकेट स्पर्धेत प्रथम येणारा संघ हा जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र राहील. स्पर्धेत सहभागी होण्या‍साठी तालुकास्तरीय खालील पत्यावर संघानी नोंदणी करावी, असे विकासरत्न विलासराव देशमुख क्रिकेट चषक संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नोंदणीसाठी संपर्क :लातूर शहर : शहाजी स्पोर्ट लातूर, कॅम्पस शूज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर 9822254414, 7999993056, 8551970575, 9823099945, 8698772222. लातूर तालुका : दयानंद विद्यालय, बाभळगाव 9421483568, माऊली हॉटेल शिवाजी चौक, मुरुड 7507593534, स्वराज कलेक्शन तांदुळजा मो.9851227777, सह्याद्री अमृततुल्य चिंचोली ब. मो.9834323226, 9834323226, रेणापूर तालुका : विवेकानंद अॅकेडमी 9604057109/9423348116, औसा तालूका : पांडूरंग कृषी सेवा केंद्र, औसा 8007005752, औसा झेरॉक्स सेंटर, औसा 8657579093, सय्यद क्लॉंथ सेंटर, औसा 9175033484, जय मल्हार पान स्टॉल, उजनी 7020953893, जय मल्हार पान स्टॉल, बेलकुंड 8208564545, समर्थ एन्टरप्रायझेस, लामजना पाटी 9823357900, ओमसाई पान स्टॉल, लामजना पाटी 9309756356, व्यापारी युवक वाचनालय, किल्लारी 8605405001, महाराष्ट्र मेडिकल हासेगाव 7709779952, निलंगा तालुका : भाराकॉं पक्ष कार्यालय शिवाजी चौक, निलंगा 9689300764, 9823674999, 9665643724, 8308794222, 9764049963 देवणी तालुका : 8888248529, 9975961999, शि.अनंतपाळ तालुका : 8788511891, 7020273865, 9421367074, 8766978895, जळकोट तालुका : महेश भांडी स्टोअर्स, जळकोट 7767071777, संभाजी किराणा स्टोअर्स, जळकोट 7588875533, श्री लक्ष्मी मेडिकल, जळकोट 9423351767, जय जिजाऊ क्लॉथ सेंटर, जळकोट 9145208245, श्लोक मोबाईल शॉपी, जळकोट 9764203099, इलेव्हन फ्रेंड क्रिकेट क्लब, जळकोट 7264832307 अहमदपूर तालुका : साई शिव भोजनालय, अहमदपूर 9822790128, भारत अॅटोमोबाईल्स, अहमदपूर 9766670013 चाकुर तालुका : गोविंदा मोबाईल इले. चाकुर 9970077714, अष्टविनायक मेडिकल नळेगाव 9423270000, अमृता साडी अॅन्ड रेडिमेड चाकुर 9922188656. उदगीर तालुका : नादरगे ज्ञानेश्वर 7769870909, नागेश पटवारी 9552272427, श्रीनिवास एकुर्गेकर 9766181981, सद्दाम बागवान 8668517864.—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]