24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeमहाराष्ट्रलिंगायत महासंघाच्यावतीने जिल्हाभरात महात्मा बसवेश्‍वरांची जयंती उत्साहात साजरी

लिंगायत महासंघाच्यावतीने जिल्हाभरात महात्मा बसवेश्‍वरांची जयंती उत्साहात साजरी


लातूर ः लिंगायत महासंघ लातूर जिल्ह्याच्यावतीने महात्मा बसवेश्‍वरांची जयंती जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त जिल्हाभर महात्मा बसवेश्‍वरांना सकाळी 9 वाजता लिंगायत महासंघाच्यावतीने तेथील स्थानिक पदाधिकार्‍यांमार्फत अभिवादन करण्यात आले व प्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.

लातूर येथे लिंगायत महासंघाच्यावतीने लातूर येथील महात्मा बसवेश्‍वरांच्या पुतळ्यास लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.विक्रम काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मग्गे, उपमहापौर चंद्रकांत बिरादार, लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथप्पा भुरके, बहुजन वंचित आघाडीचे जगदीश माळी, महिला आघाडीच्या सौ.स्वामी, योगीता परळीकर, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कुडूंबले, कोषाध्यक्ष विश्‍वनाथ स्वामी, शंकर पाटील चिघळीकर, शिवदास लोहारे, बाबुराव मुक्तापुरे, लिंगायत महासंघाचे लातूर शहराध्यक्ष बलराज खंडोमलके, लिंगायत महासंघाचे लातूर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिराजदार, चंद्रकांत तोळमारे, लिंगायत विकास परिषदेचे शरणप्पा अंबुलगे, बसवराज सुलगुडले, सचिन हुरदळे, मन्मथ पंचाक्षरी, शिवसेनेचे त्र्यंबक स्वामी, सुरेश बजगुडे, महादेव गायकवाड, सोमनाथ स्वामी यांच्यासह असंख्य समाजबांधव याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रा.सुदर्शनराव बिरादार, आ.विक्रम काळे, शिवाजीराव माने, जगदीश माळी, गुरूनाथ मगे, चंद्रकांत बिरादार आदिंची भाषणे झाली. आ.विक्रम काळे व प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्याहस्ते प्रसाद वाटपाची सुरूवात करण्यात आली. या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्‍वर चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात अनेक युवकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कमलाकर डोके यांनी केले तर आभार लिंगेश्‍वर बिरादार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]