*लिंगायत वधू वर मेळावा*

0
315
मंदिरापेक्षा विधवा, परित्कत्यात देव पाहाणारी शिवा युवा लिंगायत संघटना
– विनायकराव पाटील
लातूर – युवा लिंगायत युवक संघटना लातूर आयोजित राज्यस्तरीय लिंगायत वधू वर परीचय महामेळाव्याचे उद्घाटन माननीय विनायकराव पाटील माजी मंत्री यांच्या हस्ते बिडवे लॉन्स लातूर येथे संपन्न झाले. महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शंकर मोरगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, कमलाकर पाटील,चंद्रशेखर पाटील, दयानंद पाटील संस्थापक अध्यक्ष शिवा लिंगायत युवक संघटना, उपाध्यक्ष मनिषाताई बोळशेट्टे, ललीता सिध्देश्वरे,आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील यांनी केले. ते म्हणाले ही संघटना समाज मन जाणून काम करणारी आहे. शिवा युवा लिंगायत संघटनेने हे कार्य हाती घेतले आहे.
तर माजी राज्यमंञी विनायकराव पाटील म्हणाले की,पारंपारिक पद्धतीने विवाह जुळून येणे आजच्या धावपळीच्या युगात कठीण झालेले आहे. मुला-मुलींना एकत्र आणून त्यांच्यात आयोजनाच्या
हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.मंदीरापेक्षा विधवा, परित्कत्यात देव पाहाणारी शिवा युवा लिंगायत संघटना आहे
मोठ्या प्रमाणात पालक वधू वर उपस्थित होते. मेळाव्यात जुळलेली लग्न विवाह लावून  देण्याचे आयोजन समितीने जाहीर केले आहे. अशी माहीती प्रसिध्दी प्रमुख तथा उपाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवण शाबादे,सचिव चंद्रकांत बिराजदार, विठ्ठल आप्पा खरे , कोषाध्यक्ष सुनील भिमपूरे, लातूर जिल्हा अध्यक्ष नितीन कंठेकर, उपाध्यक्ष दयानंद बिराजदार, शहराध्यक्ष शिवहार बिराजदार, शरण बिराजदार,आदीने परीश्रम घेतले.
तर आभार अध्यक्ष मनीषाताई बोळशेट्टे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here