23.4 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुट, पूणेचे मानाचे उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक विलास...

*वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुट, पूणेचे मानाचे उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक विलास सहकारी साखर कारखान्यास जाहीर*

      *राज्यभरात उसविकास अंतर्गत कल्याणकारी योजनांचे कौतूक*

:लातूर – ; शनिवार दि. १४ जानेवारी २०२३
सहकार आणि साखर उदयोगातील मार्गदर्शक संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून गळीत हंगाम २०२१-२२ ची मानाची राज्यस्तरीय पारितोषीके नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता. लातूरला जाहीर झाले आहे. या पारितोषीकामूळे सहकार आणि साखर कारखानदारीत विलास साखर कारखान्याच्या शास्त्रीय पध्दतीने राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी शेतकरी हिताच्या अभिनव उस विकास योजनांचे राज्यभर कौतूक होत आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणेकडून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस विकास व संवर्धन कामामध्ये राज्यभरातील कारखान्यांनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करून विलास सहकारी साखर कारखानाची ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या सोहळयात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना परिवाराचे लातूर जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी, कामगार, उदयोजक, व्यवसायीक यांच्यासह सर्वांगीण विकासात उल्लेखनीय योगदान आहे. या परीवारातील साखर कारखान्यामूळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. युवकांच्या हाताला रोजगार आणि व्यवसायीकांना व्यवसाय प्राप्त झाला आहे.

या कारखान्यांनी काळाची पाऊले ओळखून नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शेतीसाठी लागणार मनुष्यबळ गेल्या काही वर्षापासून कमी पडत आहे, हे पाहून ऊस शेतीमध्ये हार्वेस्टरचा वापर करण्यात येत आहे. लातूर जिल्हयाची राज्यात आणि देशपातळीवर साखर उदयोगातून झालेल्या प्रगतीमूळे वेगळी ओळख देखील निर्माण झाली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना प्रारंभीपासून यशस्वी वाटचाल करीत आहे.


उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पारितोषीक
विलास सहकारी साखर कारखाना युनीट १ ला वसंदादा शुगर इ. कडून उत्तर पूर्व विभागातील ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक मिळाले आहे. कारखान्याने ऊस विकास, एकरी ऊसाची उत्पादकता, पाणी व्यवस्थापन, ऊस तोडणी यांत्रीकीकरणासाठी केलेले काम यासाठी महत्वाचे ठरले आहे. विशेषता ठिबक सिंचन, माती परिक्षणावर आधारीत खत वापर, पथदर्शक ऊस लागवड, ऊसरोपे व सुधारीत वाणाचे बेणे वापरातील सातत्य, कृषी विभागातील कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांना वेळोवळी दिलेले प्रशिक्षण, मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताच्या वापरावर भर, ऊस तोडणी यंत्रे तसेच ऊस शेतीतील यांत्रीकीकरणासाठी विशेष तरतूद केली आहे. कारखान्याचे हे सर्व उपक्रम ऊस विकास आणि संवर्धनासाठी अनुकरणीय ठरले आहेत. विलास कारखान्याकडून ऊस शेती व तोंडणी यांत्रीकीकरण योजना, कृषी अवजारांचा पुरवठा योजना, एकात्मिक पाणी व्यवस्थापन, ऊस संपर्क अभियान, ऊस पीक स्पर्धा, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपन कारखान्याच्या या सर्व ऊस विकासाच्या योजना सभासद, ऊस उत्पादक हिताच्या कल्याणकारी योजना असून सर्व कारखान्यासाठी योजना पथदर्शी ठरल्या आहेत. या सर्व कामाचे मुल्यमापन करून ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीकासाठी कारखान्याची निवड केली आहे. मागील गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ७,६३,४१७ मे. टन ऊसाचे गाळप होवून ८,६३,६१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर ऊतारा ११.२८ टक्के मिळाला आहे.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्यास या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’, ‘सहकार भुषण’, ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’, ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’‘उत्कृष्ट ऊस विकास’ ‘सहकारनिष्ठ पारितोषिक’‘पर्यावरण गौरव’‘ऊस भूषण’‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ ‘सर्वोत्कृष्ट चिफ अकौटंट’अशी २८ पारितोषिके मिळाली आहेत. या मिळालेल्या २९ व्या पारितोषीकामूळे एक नवा विक्रम विलास कारखान्याने यशस्वी वाटचाल करून प्रस्तापीत केला आहे.
हा पुरस्कार माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा.चेअरमन रविद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व सर्व संचालक मंडळ स्वीकारणार आहेत.

या पारितोषिकाने विलास कारखान्यास गौरविण्यात आले, याबददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी कार्यकारी संचालक संजीव देसाई, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]