26.5 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीवाढदिवस रुग्णवाहिकेचा…

वाढदिवस रुग्णवाहिकेचा…

चाकूर..’कोव्हिड १९’ काळात रुग्णवाहिकेचा तुटवडा पाहून कोव्हिड रुग्णांसाठी सरकारी यंत्रणेसोबत काम करणाऱ्या चाकूर (जि.लातूर) येथील ‘आम्ही चाकूरकर’ ग्रुप ने लोकसहभागातून मागच्या वर्षी रुग्णवाहिका घेतली. आज बुधवार (दि.८) रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेचा वाढदिवस गणेश शिवराज स्वामी यांच्या मंत्रोच्चाराने व तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, जेष्ठ नागरिक नंदकुमार शेटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी वर्षभर सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला.


‘कोव्हिड १९’ काळात रुग्ण व नातेवाईक यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र काम ‘आम्ही चाकूरकर’ ग्रुप च्या वतीने करण्यात आले. ऑक्सिजन बेड ची संख्या वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा, रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था, रुग्णालयात गादी, पलंग, करमणुकीसाठी टेलीव्हीजन संच, औषध व इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळण्यासाठी प्रयन्त आदी कामे ‘आम्ही चाकूरकर’ ग्रुप च्या माध्यमातून लोकसहकार्याने करण्यात येत होती. यावेळी आरोग्य सुविधा देण्यासाठी खाजगी वाहनधारकांकडून करण्यात येणारी अडवणूक व लूट मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही बाब चाकूरच्या कोव्हिड रुग्णालयात सासूबाईला भेटण्यासाठी आलेल्या मुंबई अग्निशमनदलात नौकरीस असलेल्या एका अधिकाऱ्यांनी आम्ही चाकूरकर ग्रुप च्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आम्ही चाकूरकर ग्रुप चे प्रमुख प्रशांत शेटे यांनी रुग्णवाहिका घेण्याचा मनोदय व्यक्त केला. याला संगमेश्वर जनगावे, विनोद निला, सुधाकर हेमनर, सदाशिव मोरे, संग्राम वाघमारे, शिवदर्शन स्वामी, विकास स्वामी, वर्धमान कांबळे, युवराज पाटील आदी सहकाऱ्यांनी पाठींबा दिला.
प्रशांत शेटे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असलेल्या रुग्णवाहिकेला मदत करण्याचे आवाहन सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले. याला चाकूर शहर, तालुक्यातील दातृत्वान व्यक्तींसह देश – विदेशात राहणाऱ्या भूमीपुत्रांनी मदत केली. त्यामुळे रुग्णवाहिका घेण्याचा संकल्प सिद्धीस गेला. ‘आम्ही चाकूरकर’ ग्रुप चे काम पाहून रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास लाईफ केअर रिसर्च सेंटर च्या चेअरमन डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी श्रीधर निकम, डॉ.विनोद तांदळे, डॉ.चेतन पाखले, जेष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. ही रुग्णवाहिका वर्षभराच्या कालखंडात ‘जीवनदायिणी’ ठरली आहे. वर्षभरात रुग्णवाहिकेने रुग्णांना घेऊन चाकूर ते लातूर १०३ फेऱ्या केल्या आहेत. यासोबतच नांदेड, सोलापूर, बिदर, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी रुग्णांची व अपघातग्रस्तांची गरज लक्षात घेऊन वेळेवर पोहोंच करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे तत्पर चालकांची भूमिका बजावणाऱ्या गोपीनाथ कांबळे, वर्धमान कांबळे, पपन कांबळे यांचा तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचे रुग्णवाहिकेच्या वाढदिवसानिमित्त कौतुक करण्यात आले.

१) “सरकारी यंत्रणेला कोव्हिड काळात आम्ही चाकूरकर या ग्रुप ने खुप सहकार्य केले आहे. स्वतःच्या प्राणांची जोखीम पत्करून कोव्हिड रुग्ण व नातेवाईकांसाठी त्यांनी केलेले परिश्रम आजही मी विसरू शकलो नाही. त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.”
– डॉ.शिवानंद बिडवे, तहसीलदार चाकूर

२) “समाजातील दातृत्ववान व्यक्तींच्या सहकार्यामुळेच आम्ही रुग्णवाहिका घेऊ शकलो. वर्षभरात या रुग्णवाहिकेमुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी काम करणारी रुग्णवाहिका जनतेची आहे. आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काम पाहत आहोत. रुग्णवाहिकेला प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.”
संगमेश्वर जनगावे, आम्ही चाकूरकर ग्रुप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]