पंढरपूरच्या धर्तीवर लातूरात भव्य-दिव्य विठ्ठल रूक्मिनी मंदिराची उभारणी
परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान ः मंदिर परिसरात गणपती व महादेव मंदिराची उभारणी
लातूर दि.08/12/2021
लातूर शहर व परिसरातील भाविकांची श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या भव्य-दिव्य मंदिराची उभारणी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विठ्ठल रूक्मिनी मंदिर ट्रस्टीच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली असून मजगे नगर परिसरातील 100 बाय 110 फूट जागेत 51 फूट ऊंचीच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या मंदिरासाठीचा कळस पंढरपूरहून मागविण्यात येणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर विठ्ठल रूक्मिनी मंदिराची उभारणी होत असल्याने भविष्यात विठ्ठल रूक्मिनीच्या दर्शनासाठी मजगे नगरातील मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार आहे.

शहरातील मजगे नगर परिसरात पंधरा ते वीस वर्षापूर्वीचे विठ्ठल रूक्मिनीचे मंदिर आहे. या मंदिराची उभारणी व्हावी, अशी या परिसरातील भाविकांची ईच्छा होती. याबाबत ट्रस्टीचे अध्यक्ष तथा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भाविकांची ईच्छा लक्षात घेऊन विठ्ठल रूक्मिनी मंदिराची उभारणी करण्याचा संकल्प केला. विठ्ठल रूक्मिनी मंदिर ट्रस्टीच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर व अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी सर्व ट्रस्टींना सोबत घेऊन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रूक्मिनी मंदिराच्या उभारणीच्या कामास सुरूवात केली असून या मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. विठ्ठल रूक्मिनी मंदिर परिसरात भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीसह 35 बाय 50 चे मुख्य सभागृह, गार्डन, नवीन कंपाऊंड, लहान मुलांना खेळण्यासाची सोय तसेच मंदिर परिसरातच छोटेसे गणेश मंदिर व महादेवाच्या मंदिराची उभारणीही करण्यात येणार आहे. या मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू असून कोषाध्यक्ष दिगंबर शेटे, सदस्य ज्ञानेश्वर चाटे महाराज, चंद्रकांत वैरागकर, सचिन शेंडे पाटील, बाबूराव मोटे, मोहन गंगथडे, तुळशीराम कोयले, हरिभाऊ मुंढे, राजकुमार शेटे, प्रकाश शिंदे, उमाकांत उरगुंडे यांच्यासह आदींनी परिसरातील नागरिक परीश्रम घेत आहेत. भविष्यात प्रतीपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या मजगे नगर येथील विठ्ठल रूक्मिनी मंदिरात भावीक भक्तांची गर्दी वाढणार आहे.
——————————