22.9 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसाहित्य*शब्दसुरांच्या सरीत भिजले गुलबर्ग्याचे मराठी रसिक*

*शब्दसुरांच्या सरीत भिजले गुलबर्ग्याचे मराठी रसिक*

गुलबर्गा ;दि.६ ( विशेष प्रतिनिधी )’नजाकत’ हा मराठी गझलांचा कार्यक्रम महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातही लोकप्रिय होत आहे.
नुकताच कर्नाटकातील गुलबर्गा येथील मराठी साहित्य मंडळ या ७५ वर्ष जुन्या संस्थेने तेथील मराठी रसिकांसाठी गझलांचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला तेथील मराठी रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
गझल ही संवादू असते, शब्दांचं सौंदर्य सूर-संगीताच्या साथीनं अधिक खुलतं. प्रसिद्ध संगीतकार- गायक अतुल दिवे आणि वैशाली राजेश यांची गझल मैफिल नुकतीच गुलबर्गा शहरात मराठी साहित्य मंडळाच्या वा.कृ. जोशी सभागृहात पार पडली. या मैफलीत उत्तमोत्तम अशा मराठी हिंदी-उर्दू गझलांचा प्रत्यक्ष अनुभव तेथील रसिकांनी घेतला.

या मैफलीत सुरेश भट, वैभव जोशी, डॉ. इक्बाल मिन्ने, दिलीप पांढरपट्टे, व्यंकटेश कुलकर्णी, गिरीश जोशी, रमेश ठोंबरे आत्माराम जाधव डॉ. राज रणधीर, प्राजक्ता पटवर्धन, सिक्कीमचे प्रताप सिंग अशा विविध गझलकांच्या गझला गायल्या गेल्या. त्याचबरोबर खास फर्माईशी नुसार रंजिश ही सही, आज जाने की जिद ना करो अशा काही लोकप्रिय गजलाही श्रोत्यांना ऐकायला मिळाल्या. कार्यक्रमाचे निवेदन हैदराबाद येथील गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी केलं.


या गझल मैफिलीचं आयोजन ज्येष्ठ लेखक श्री. सर्वोत्तम सताळकर, मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष शहा, कार्यवाह श्री. विद्याधर मुरुगकर यांनी केलं होतं.
‘नजाकत’ चे अतुल दिवे आणि वैशाली राजेश यांनी मराठी गझल सर्वदूर पोहोचावी यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर विविध ठिकाणी गझल मैफिली आयोजित करणार असल्याचे या प्रसंगी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]