33.9 C
Pune
Thursday, June 25, 2026
Home कृषी शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांचे आंदोलन

0
579

मांजराच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच न्‍याय हक्‍कासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

जोपर्यंत एफआरपी प्रमाणे भाव मिळणार नाही तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही-आ.रमेशअप्‍पा कराड

लातूर दि.०९– असंख्‍य शेतकाऱ्याचे संसार ऊसाच्‍या पिकावर अवलंबून आहेत. आम्‍ही कोणाच्‍या व्‍यक्‍तीगत विरोधात नाहीत. रात्रंदिवस काबाड कष्‍ट करून मुलाप्रमाणे सांभाळलेल्‍या ऊसाच्‍या पिकाला हक्‍काने शासनाच्‍या नियमानुसार भाव मागतोय भिक मागत नाहीत. जोपर्यंत एफआरपी प्रमाणे भाव मिळणार नाही तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही असे सांगून येत्‍या ३० ऑगस्‍ट पर्यंत मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाची रक्‍कम एफआरपी प्रमाणे व्‍याजासह शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर जमा करावी अन्‍यथा १७ सप्‍टेंबर २०२१ मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनी आक्रमकपणे आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलनात बोलताना दिला.

मांजरा परिवारातील मांजरा, विलास आणि रेणा या साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाला आतापर्यंत आदा केलेली आणि एफआरपी प्रमाणे होणारी रक्‍कम यातील फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांना देण्‍यात यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली ९ ऑगस्‍ट क्रांतीदिनी मांजरा साखार कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलन करण्‍यात आले. मांजरा कारखान्‍याच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच शेतकऱ्यांनी आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मांजरा परिवारातील कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रातील ऊस उत्‍पादक शेतकऱ्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजारोच्‍या संख्‍येनी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्‍यांनी या वेळी दिलेल्‍या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात सहभागी झालेल्‍या नेत्‍यासह आंदोलन कर्त्‍यांनी आंदोलन नंतर आंदोलनस्‍थळी सोबत आणलेली चटणी भाकरी खावून आंदोलनाचा समारोप केला.

या आंदोलनस्‍थळी भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, जिप अध्‍यक्ष राहूल केंद्रे, प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपाचे संजय दोरवे, किरण उटगे, शिवाजीराव केंद्रे, रामचंद्र तिरूके, अशोककाका केंद्रे, रोहिदास वाघमारे, गोविंद चिलकुरे, स्‍वाती जाधव, प्रेरणा होनराव, मनिष बंडेवार, ज्ञानेश्‍वर चेवले, मुक्‍तेश्‍वर वागदरे, राजकुमार कलमे, अनिल भिसे, आप्‍पा मुंडे, विक्रम शिंदे, बाबु खंदाडे, प्रदिप मोरे, सुर्यकांत शेळके, बाबासाहेब घुले, सुरज शिंदे, काकासाहेब मोरे, अमोल पाटील, सुरेंद्र गोडभरले, संतोष वाघमारे, शैलेश गोजमगुंडे, भागवत सोट, विजय काळे, हणमंतबापू नागटिळक, उषा रोडगे, ललिता कांबळे, लता भोसले, दिलीप धोत्रे, धनराज शिंदे, शरद दरेकर, भैरवनाथ पिसाळ, अशोक बिराजदार, गोविंद मुंडे, विनायक मगर, श्रीकृष्‍ण मोटेगवकर, अनिल येलगटे, वैभव सापसोड, अनंत कणसे, राजकिरण साठे, अभिषेक आकनगिरे, रमाकांत फुलारी, पांडूरंग बालवाड, राजेंद्र जवंडरे, किरण मुंडे, शंकर चव्‍हाण, प्रताप पाटील, रशिद पठाण, संतोष चव्‍हाण, भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, लातूर तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे, रेणापूर तालुकाध्‍यक्ष दशरथ सरवदे यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

 मांजराच्‍या उभारणीत बब्रूवानजी काळे तात्‍या, उत्‍तमराव मोरे मामा, शिवमुर्ती शेटे मालक, शिवाजीराव सुर्यवंशी, शेख नजीरमियॉ, शिवाजीराव भिसे यांच्‍यासह अनेकांनी मेहनत घेतली. रामभक्‍त म्‍हणून स्‍व. बब्रूवान काळे यांनी विलासरावांना साथ दिली स्‍व. विलासरावजी देशमुख यांचे स्‍मारक तर झालेच पाहिजे यात दुमत नाही मात्र मांजरा कराखान्‍याचे देशपातळीवर नावलौकीक करणाऱ्या स्‍व. बब्रूवानजी काळे तात्‍या यांचाही पुतळा कारखाना परिसरात उभारला पाहिजे अशी आग्रही मागणी करून आ. कराड म्‍हणाले की, जर कारखान्‍याने नाही उभारला तर शेतकऱ्यांकडून पई पई गोळा करून पुतळा उभारू ही आमची अस्मिता आहे.

अनेक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर वेदना मांडल्‍या. त्‍यांना आधार देण्‍यासाठी हे आंदोलन करत असून शेतक-यांना स्‍वाभिमान आणि अभिमान मिळवून दिल्‍याशिवाय राहणार नाही. ऊस उत्‍पादक शेतकरी कारखान्‍याचे मालक असतानाही भावासाठी कारखान्‍याच्‍या दारात बसण्‍याची पाळी आली आहे. तीन वर्षात दोनदा ऊस जातो शेतकऱ्यांना आतापर्यंत कारखान्‍यांनी २२००/- रूपये दिले उपकार केले नाहीत. शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या हक्‍काचा, घामाचा, कष्‍टाचा मोबदला मिळाला पाहिजे. आजपर्यंत सहन केले यापुढे कदापी सहन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना भिकारी समजत असाल तर तुम्‍हालाही भिकारी केल्‍याशिवाय शेतकरी राहणार नाहीत. कारखाना हा शेतकऱ्यांचा पांडूरंग आहे. त्‍याला बडव्‍यांनी कोंडून ठेवले आहे. बडव्‍यांच्‍या दुष्‍ट चक्रातून पांडूरंगाला मुक्‍त करावेच लागेल असेही आ. कराड यांनी बोलून दखखविले.

लातूर ग्रामीण मधील आमदारांनी कोणाच्‍या विरोधात निवडून आलात हे सांगावे. जनतेनी ३० हजार मते नोटाला दिली. येणाऱ्यां विधानसभा निवडणूकीत जनतेल्‍या आशिर्वादाने ५० हजार मताधिक्‍याने पाठ लावल्‍याशिवाय राहणार नाही असे सांगून आ. कराड म्‍हणाले की, स्‍व. विलासरावजी विरोधकांना मानसन्‍मान देत होते. मात्र आजचे मस्‍तवाल पालकमंत्री मगरूर आहेत. ज्‍या जनतेनी मान सन्‍मान वैभव दिला ती जनता कोरोनाच्‍या संकटात असताना त्‍यांनी आधार देण्‍याचे काम केले नाही. राज्‍यात सर्वाधिक भ्रष्‍टाचार आरोग्‍य विभागात झाला असून विधीमंडळाचे अधिवेशन पुर्ण कार्यकाळ झाले असते तर आरोग्‍य खात्‍याच्‍या दोन्‍ही  मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता.

सहकार क्षेत्रातील होणारी लूट थांबविण्‍यासाठी आणि होत असलेला भ्रष्‍टाचार थांबविण्‍यासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केंद्रात सहकार खात्‍याची निर्मीती करून अमित शहा यांच्‍याकडे जबाबदारी दिली आहे. अमित शहा काय करू शकतात याची जाणीव सबंध देशवाशीयांना आहे. आजच्‍या क्रांतीदिनी शेतकऱ्याच्‍या न्‍याय हक्‍कासाठी क्रांतीची मशाल पेटली आहे. मांजरा परिवार जोपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील.आंदोलनात सहभागी झाल्‍याने कोणी जर ऊसाची भिती दाखवून धमकी देण्‍याचे ऊसाच्‍या नोंदीत गडबड करण्‍याचे प्रकार केले तर त्‍यांना चोख उत्‍तर दिले जाईल असेही आ. रमेशअप्‍पा कराड यांनी बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]