*जागृती शुगरकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 100 रू.चा हप्ता जाहीर*
*सणासुदीच्या दिवसांत जागृतीने १०० रुपयांचा हप्ता दिल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा*
*४ कोटी रुपये ऊस पुरवठा शेतकऱ्यांना मिळणारं*
देवणी. दि. ३०.
साखर उद्योगात खाजगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शेतकरी सभासदांच्या जिवनात आर्थिक परिवर्तन घडवून अल्पावधीतच नाव लौकिक प्राप्त केलेल्या देवणी तालुक्यांतील तळेगांव येथील जागृती शुगर कारखान्यास गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप झालेल्या ऊसाला यापूर्वी प्रति मे.टन रुपये 2200 (दोन हजार दोनशे) प्रमाणे एफ आर पी ची रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात आलेली होती माञ नुकत्याच होवू घातलेल्या पोळा, गौरी गणपती सणासाठी व शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन जागृती शुगर चे संस्थापक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हंगाम 2020- 21 मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे. टन रुपये 100 रू (शंभर रू. ) या प्रमाणे हप्त्याची रक्कम आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यानी दिली यापूर्वीच एफ. आर.पी.ची रक्कम कारखाना प्रशासनाने दिली असताना मांजरा परिवाराकडून परंपरेनुसार सणासुदीच्या काळात जागृती शुगर ने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० रुपयांचा हप्ता दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
दरम्यान जागृती शुगर ने आतापर्यंत हंगामात एफ आर पी पेक्षा जास्तीची रक्कम उस उत्पादक पुरवठा सभासदांना देण्याचा विक्रम जागृती शुगर इंडस्ट्रीज ने केला आहे हे विशेष आहे
राज्यात खाजगी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जागृती शुगर ने यापुर्वीच एफ आर पी नुसार उस पुरवठा सभासदास रक्कम अदा केली असताना सुद्धा मांजरा परिवाराने परंपरे नुसार १०० रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामूळे ४ कोटी रुपये ऊस पुरवठा दाराना मिळणार आहेत त्यासंदर्भात जागृती शुगर कारखाना प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या ऊस बिलाची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार यांच्या बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन सौ गौरवीताई अतुलजी भोसले (देशमुख) उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे
प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे











