Homeसहकारशेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार -दिलीपराव देशमुख

शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार -दिलीपराव देशमुख

शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार जिल्हा बँकेच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या

शेतकऱ्यांची जाण असणारे उमेदवार देणार

उदगीर जळकोट तालुक्यातील सोसायटी मतदारांची संवाद बैठक संपन्न माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

लातूर दि. ६.लातूर जिल्हा बँकेने नेहमी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्न केले असून ग्रामीण भागातील इथे प्रपंचाचा विषय असल्याने सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यामुळे आगामी निवडणुकीत आमच्या पॅनलच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्यावा असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले .

ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे उदगीर व जळकोट तालुक्यातील जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सोसायटी, मजूर संस्था, पतसंस्था , मत्स संस्थेतील मतदारांशी संवाद बैठक रविवारी पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड प्रवीण पाटील काँग्रेसचे प्रदेश सचिव कल्याण पाटील बाजार समितीचे सभापती शिवाजी हूडे माजी सभापती मुन्ना पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बिरादार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक मारुती पांडे,संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक दिलीप पाटील नागराळकर संचालक अनुप शेळके संचालिका श्रीमती भोसले ताई बाजार समितीचे उपसभापती प्रीती भोसले मधुकर एकुरगेकर रामेश्वर बिरादार शीलाताई पाटील, हरीराम कुलकर्णी, यांच्या सह मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .

*जिल्हा बँक एक विचार एक मत*

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या अनेक वर्षापासून एक विचार एक मताने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक मदत करता येईल असे कार्य करत आहे त्यामुळे आगामी काळात सुद्धा शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगून विरोधकांना साधी पतसंस्था कारखाने नीट चालवता येत नसेल तर लोक विश्वास कसा ठेवतील असा विरोधकांना सवाल करत आमच्या सोबत देशाचे सहकार राज्याचे सहकार विभाग सोबत आहेत असे सांगून आगामी काळात होणाऱ्या बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले

*जिल्हा बँक प्रगतीपथावर*

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून त्यांना आर्थिक मदत केली असून बँक नफ्यात चालवून राज्यात नावलौकिक म्हणून लातूर बँकेचा उल्लेख होतोय आगामी काळात सुद्धा शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल च्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments