*शेतीचा प्रयोग बहरला*

0
281

निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोनी यांनी दीड एकरात ” जिरेनियम शेतीचा प्रयोग घेऊन बहरला…!

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोनी यांनी दीड एकर ” जिरेनियम शेतीचा प्रयोग करुन आता बहरात आले आहे.सततच्या निसर्गाचा लहरीपणा,पारंपारिक पिकांच्या उत्पादनातील आणि भावातील अनिश्चितता यातून मार्ग काढण्यासाठी प्रयोगशील शेतकरी नाविण्यपूर्ण पिकांच्या शोधात असतात.आता या प्रयोगातून त्यांनी जिरेनियमच्या लागवडीकडे वळले आहेत.


जिरेनियमच्या उत्पादनाचा फायदा अत्तरे,सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी असल्याने सौंदर्य प्रसाधने उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते.त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे.त्यानुसारच,निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोनी यांनी दीड एकरात जिरेनियम शेती करुन गावातील आणि परिसरातील शेतकर्‍यांना नाविण्यपूर्ण प्रयोग शेतीकडे वळण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे.


एकंदर वातावरणानुसार शेती पिकांचे बदल होत असल्याने त्यांनी जिरेनियम शेतीचा प्रयोग उत्तमरित्या निवडल्याने त्यांचे कौतुक परिसरात शेतकरी करीत आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांनीही हा प्रयोग करुन आपल्या शेतात जिरेनियम लागवड करून भमरसाठ उत्त्पन घेण्याचे आवाहनही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here