23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeमनोरंजन*श्रीकिशन देवांगनच्या सुमधुर गायनाने आवर्तन ची ९७ वी मासिक संगीत सभा संपन्न*

*श्रीकिशन देवांगनच्या सुमधुर गायनाने आवर्तन ची ९७ वी मासिक संगीत सभा संपन्न*


 लातूर ; दि. 30 मार्च 2023( प्रतिनिधी) – लातूर येथील आवर्तन व अष्टविनायक  प्रतिष्ठान च्या वतीने गत 96 महिन्यांपासून अव्याहतपणे प्रत्येक महिन्याला शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन केले जाते. 97 वी मासिक संगीत सभा रायपुर छत्तीसगड येथील किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक कलावंत श्री किशन देवांगन यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने संपन्न झाली.   

श्री किशन देवांगन यांनी प्रातःकालीन संगीत सभेची सुरुवात “मिया की तोडी” या रागाने केली या रागातील “मेरो मन या”  विलंबित एकतारा मध्ये निबद्ध बंदीशीच्या माध्यमातून त्यांनी राग आळवायला सुरुवात केली रागाच्या अनुषंगाने केलेली दमदार आलापी सौंदर्य पूर्ण ढंगाणे घेतलेले बोल आलाप, बेहलाव्यामधील नजाकत आणि पढंत यामधील शब्द स्वर व दृत लयीमध्ये घेतलेल्या बोलताना वैविध्यपूर्ण तानबाजीने रसिक श्रोत्यांना भावविभोर अवस्थेमध्ये नेले याला जोडूनच किशन देवांगन यांनी “सोहम हर डमरू बाजे” ही द्रुत एकताल मधील बंदिश गायली सम, विषम, अतीत, अनागत, ग्रहांच्या यथोचित उपयोग करत अतिशय चमत्कती पूर्ण रीतीने त्यांनी आपली प्रस्तुती केली.    मैफिलीच्या उत्तरार्धाची सुरुवात “राग आहेर भैरव” ने झाली विलंबित एकताला मध्ये निबद्ध “रसिया म्हारा” या बंदीशी मधून केलेला वैविध्यपूर्ण अविष्कार गायकाच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देत होता स्वर लगाव, रागाची शिरोदक्तपणे केलेली उकल विविध नजाकती हरकतीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले याला जोडून मोरे राजा रसिया या दृत एक तालामध्ये निबद्ध अहिर भैरव ची समाप्ती केली श्री. किशन देवंगन  यांनी मैफिलीचा शेवट राग केदार ने केला “नंदन कान्हारे” ही तीनताल मधील निबद्ध बंदिशिने आपल्या गायनाची समाप्ती केली श्री. किशन देवांगन यांना संवादिनी संगती प्राध्यापक शशिकांत देशमुख यांनी अप्रतिम रित्या केली व तबला संगती श्री.संजय सुवर्णकार यांनी केली साथीदार कसे असावेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून यांचा उल्लेख करावा लागेल मुख्य कलावंतांच्या अविष्काराला कुठेही बाधा येऊ न देता संगतीकरण खरोखरच हे कौशल्य असतं त्या दृष्टीने मैफिलीच्या यशस्वीतेमध्ये प्राध्यापक शशिकांत देशमुख व श्री. संजय सुवर्णकार यांचा मोलाचा वाटा आहे तानपुऱ्यावर श्री. राम हिबारे व श्री. अधिराज जगदाळे यांनी साथ संगत केली.  या कार्यक्रमाला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. राजकुमार पाटील व प्राध्यापक महावीर उदगीरकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अभय शहा व सर्व विश्वस्त व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी आपल्या समर्पक वाणीने केले व कलावंतांचा परिचय प्रा. हरी

सर्वोत्तम जोशी यांनी करून दिला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री.दिनकर पाटील यांनी सर्व कलावंतांचा यथोचित सन्मान केला व कार्यक्रमानंतर राम नवमी निमित्त श्री दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी सर्व रसिकांना श्री राम जन्मोत्सवासाठी व  महाप्रसादासाठी आमंत्रित केले होते हाही कार्यक्रम अतिशय भक्तिमय स्वरूपात संपन्न झाला. या दोन्ही कार्यक्रमाला लातूर मधील रसिकांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]