सत्कार

0
301

पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्दल डॉ. मनीषा नागीले यांचा सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने सत्कार                     

मुरुम, ता.उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी) : येथील भीमनगरच्या रहिवाशी तथा बलसूर येथील भाऊसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभागात अध्यापनाचे कार्य करत असलेल्या प्राध्यापिका डॉ. मनीषा जनार्धन नागीले यांनी डॉ. पंडीत साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून हिंदी विषयांतील पीएच. डी. ची पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच प्रदान केली होती. त्यांच्या या यशाबद्दल सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने पंचशीला किरात व प्रणाली आबाराव कांबळे यांच्या हस्ते माजी पोलिस उपनिरीक्षक राम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (ता. ३) रोजी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मनीषा नागीले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या आदर्श सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या त्याग व बलीदानाच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊनच मी वाटचाल करत प्रतिकूल परिस्थितीवर माथ करुन परिश्रम घेतले. या यशात माझे आई-वडील, पती व समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी राम कांबळे यांनी डॉ. मनीषा नागीले यांच्या केलेल्या अथक प्रयत्न करून मिळविलेल्या पदवीबद्दल अभिनंदन केले. मुलींनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धम्ममित्र सुनीता कांबळे यांनी केले. यावेळी सुनील भालेराव, उज्वला कांबळे, कविता कांबळे, वसुमती बनसोडे, धम्ममित्र अभिजित कांबळे, अमर कांबळे, गौरव कांबळे, अजिंक्य कांबळे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here