*सदिच्छा भेट*

0
281

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पुणे निवासस्थानी निटूर सर्कलमधील कार्यकर्त्यांनी घेतली भेट..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लॅप्रोस्कोस्पिक पिशाशय शस्ञक्रिया झाल्याने त्यांचे आरोग्य उत्तमदायी राहो याकरिता पुणे येथे जाऊन निटूर सर्कलमधील कार्यकर्त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांच्या लातूर दौर्‍यानिमित्त त्यांच्या हस्ते जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } व अन्य विकास सोहळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आले असता अचानक माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची तबियत ठिक नसल्याने त्यांना मुंबई याठिकाणी लॅप्रोस्कोपिक पिताशय शस्ञक्रिया करण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यावर शस्ञक्रिया उत्तम झाल्याने कांही दिवस मुंबई हाॅस्पिटलमध्ये विश्रांतीसाठी होते.त्यानंतर,आपल्या पुणेस्थित निवासस्थानी आले असता जिल्हा सचिव पंकज कुलकर्णी, अशोक शिंदे,उपसरपंच संगमेश्वर करंजे,विजय देशमुख,पुरूषोत्तम भोसले आणि स्नेह भेटीत प्रा.अनिल सोमवंशी,बाळकृृष्ण डांगे,महेश तापडीया यांची उपस्थिती होती.


प्रामुख्याने या भेटीदरम्यान, माजी खा.रूपाताई { अक्का } पाटील निलंगेकर होत्या. माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निटूर सर्कलमधील कार्यकत्यांची आणि स्नेह भेटीत आरोग्या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.निलंगेकर यांनी आपल्या तबियती विषयी आस्थेवाईकपणे संवाद साधून आपली तबियत ठणठणीत होऊन मी आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात उत्साहाने काम करेन असे आश्वासित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here