आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सदिच्छा भेट जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांनी घेतली…
निलंगा येथील जनसेवक निवासस्थानी भेट घेऊन लॅप्रोस्कोपिक पिताशय शस्ञक्रियेतून बरे झाल्याने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन यथोचित सत्कार..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा विधानसभा मतदारसंघातील विधानसभेचे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना केंद्रीयमंञी नितीन गडकरी याच्या लातूर दौर्यानिमित्त विविध विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले असता आ.निलंगेकर यांची अचानक तबियत बिघडल्याने त्यांना मुंबईला जावे लागले त्यानुसार त्यांच्या शरीरातील लॅप्रोस्कोपिक पिताशय शस्ञक्रिया करण्यात आली आणि त्यातून बरेही झाले आहेत.त्यानिमित्ताने निलंगा येथील जनसेवक निवासस्थानी जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेक्षअप्पा कराड यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आरोग्यदायी लाभो याकरिता यथोचित सत्कार करण्यात आला आहे.

माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड यांनी त्याच्या तबियती विषयी आस्थेवाईकपणे विस्तृृत माहिती घेऊन आपण या लॅप्रोस्कोपिक पिताशय शस्ञक्रियेवर मात करून बरे झालात याचा मुख्य आनंद आहे असेही कराड यांनी चर्चेवेळी नमुद केले.या सदिच्छा भेटीदरम्यान विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजते आहे.याप्रसंगी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,अमोल पाटील,हनुमंत देवकते आदी जणांची उपस्थिती होती.











