27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeआरोग्य वार्ता*सर्वांगीण दंत रोग उपचारासाठी एमआयडीएसआर दंत रुग्णालय कटिबध्द*

*सर्वांगीण दंत रोग उपचारासाठी एमआयडीएसआर दंत रुग्णालय कटिबध्द*

महाविद्यालय परिषदेच्या बैठकीत कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांची माहिती

लातूर, दि. 3 – सध्याच्या धावपळीच्या जीवन पध्दतीमुळे मानवी आरोग्यावर दुरगामी परिणाम होत असून अचानकपणे अनेक प्रकारच्या गंभीर रोगांना सामोरे जावे लागत आहे. इतर आजारांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष परिणाम हा दंत रोगांच्या वाढीस कारणीभूत ठरत असतो. दंत रोगाचे वाढते प्रमाण हे संपूर्ण उपचारासाठी दंत रोग तज्ज्ञांसमोर आव्हान ठरत आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार करुन एमआयडीएसआर दंत रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारचे आत्याधुनिक दंत रोग उपचार उपलब्ध करण्यात आले असून समाजातील प्रत्येक दंत रुग्णाला सर्वांगीण दंत रोग उपचार सेवा देण्यासाठी एमआयडीएसआर दंत रुग्णालय कटिबध्द आहे, अशी माहिती एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी दिली.

Child girl check-up in dentist office. Caries prevention and dental treatment. Healthy teeth and smile. Dentistry. Children’s doctor orthodontist. Dentist appointment. Orthodontics.

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात आयोजित महाविद्यालय परिषदेच्या बैठकीत डॉ. हनुमंत कराड बोलत होते. या बैठकीस प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, दंत व्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश कांगणे, कृत्रिम दंत शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजित जाणकर, मुख वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी सुलतानपुरी, मुख व शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिराज बादल, बाल दंत रोग शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश काळे, दंत परी वेष्टन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विष्णुदास भंडारी, दंत शल्य चिकीत्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र कबीर, सार्वजनिक दंत आरोग्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अश्विनी बिरादार, तोंडी रोगनिदान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनुजा मनियार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, लातूरसह ग्रामीण भागातील दंत आरोग्य सेवेची गरज लक्षात घेवून शिक्षणमहर्षी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सन 2006 मध्ये लातूर येथे एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाची सुरुवात केली. गेल्या 17 वर्षापासून एमआयडीएसआर दंत रुग्णालय हे अविरत आणि अखंडीतपणे दंत आरोग्य सेवा देत आहे.

दंत रोगांवरील उपचारासाठी लागणारा प्रदिर्घ वेळ लक्षात घेवून एमआयडीएसआर दंत रुग्णालयाव्दारे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत अखंडीतपणे दंत रुग्णालयातील वेगवेगळ्या नऊ विभागातील उच्च शिक्षीत व अनुभवी दंत रोग तज्ज्ञांकडून मुख व दंत रोगांवर शास्त्रोक्त पध्दतीने व अद्यावत उपकरणाव्दारे उपचार करण्यात येणार आहेत. जेणेकरुन रुग्णांना दंत रोगावर तात्काळ व सुकर उपचार घेता येतील.

एमआयडीएसआर दंत रुग्णालयातील विविध नऊ विभागांतर्गत दंत रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यातील मुख वैद्यकशास्त्र विभागात (Oral Medicine) मुख व दंत रोगावरील तपासणी नाममात्र केवळ 20 रुपयांत करता येणार असून अचुक निदान, तोंडात उद्भवणारे पांढरे – लाल चट्टे यांची तपासणी तसेच मुख कर्करोग तपासणी करुन त्यावर लागणारे योग्य ते औषधोपचार केले जातील. गरज भासल्यास रुग्णांच्या दातांची क्ष – किरण तपासणी करुन सबंधीत विभागातील तज्ज्ञांकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. दंत चिकित्सा शास्त्र विभागात (Conservative Dentistry) किडलेले, झिजलेले, खराब झालेले दात वाचविण्यासाठी व पुर्ववत करण्यासाठी रूट कॅनल उपचार, रोट्री, लेझर, मायक्रोस्कोप या अत्याधुनिक उपकरणाव्दारे व दर्जेदार मटेरिअलच्या माध्यमातून उपचार करण्यात येतात.

मुख व शल्य चिकित्सा शास्त्र विभागात (Oral & Maxillofacial Surgery) ज्या दातावर उपचार करुन वाचविणे शक्य नाही अथवा अधिक प्रमाणात दंत रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास असे दात काढण्यात येतात. गरज असल्यास अशा दातावर अनुभवी मुख व शल्यचिकित्सकाकडून शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात येते. तसेच व्यसनांमुळे तोंडात उद्भवणाऱ्या अनेक आजारावर, तोंडातील गाठींवर, अपघातात मार लागून तुटलेल्या जबड्यावर, जबड्यात अडकलेल्या अक्कल दोढेवर, जबड्यांत होणाऱ्या रोगांवर गरज असल्यास शस्त्रक्रियाही केली जाते. त्याचबरोबर दंतरोग व त्यातून होणाऱ्या गुंतागुंतीचा विपरीत परिणाम हिरड्यांवर होत असल्याने दंत परी वेष्टन शास्त्र विभागात (Periodontics) हिरड्यां सबंधी सर्व आजारावर उपचार करण्यात येतात. हिरडीतून पु येणे, वास येणे असा त्रास असल्यास अशा रुग्णाच्या हिरड्यांची लेझर शस्त्रक्रिया करण्यात येते.

अलिकडच्या काळात दंत रोगाचा प्रादूर्भाव हा लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. अशा लहान मुलांच्या (1 ते 14 वर्ष) दुधाच्या दातांवर बाल दंत रोग शास्त्र विभागात (Pedodontics) बाल दंत रोग तज्ज्ञाकडून उपचार करण्यात येतात. लहान मुलांचे दुधाचे दात वाचविण्यासाठी पुढील येणाऱ्या पक्क्या नविन दातांचे संरक्षण केले जाते. ज्या मुलांच्या दातांवर उपचार करणे अवघड असते अशा बाल दंत रुग्णांसाठी आत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून संपूर्ण भूलीव्दारे व सिडेशन (योग्य त्या भुलेखाली) या उपचार पध्दतीच्या आधारे उपचार करण्यात येतात. तसेच दंत व्यंगोपचार शास्त्र विभागात (Orthodontics & Dentofacial Orthopaedics) लहान मुलांच्या वेड्या – वाकड्या दातांवर, लहान मुलांमध्ये दाताबरोबर जबड्याची वाढ व्यवस्थीत होत नसेल अशा रुग्णांच्या दातांवर अद्यावत उपकरणाव्दारे दातावरील क्लिप बसवून योग्य उपचार केले जातात.

शिवाय कृत्रिम दंत शास्त्र विभागात (Prosthodontics) पडलेल्या दातांसाठी दंत रोपण हा अत्याधुनिक उपचार (Implant), दातांवरील कॅप (Ceramic Bridges), सर्व खराब झालेल्या दातांचे संपूर्ण पुन:र्वसन (Full Mouth Rehabilitation), सुंदर हास्यासाठी दातांचे सौंदर्यीकरण (Smile Designing), संपूर्ण दात नसलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी संपूर्ण कवळी बसविण्याचे उपचार केले जातात. प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. त्यादृष्टीने सार्वजनिक दंत आरोग्य चिकित्सा विभागाच्या (Public Health Dentistry) वतीने दंतरोग प्रतिबंधासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.

त्यासोबतच ग्रामीण व शहरी भागात दंत आरोग्य शिबीर घेवून दंत रोग तपासणी, उपचार व दातांचे आरोग्य राखण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी रुग्ण व नातेवाईकांचे वैयक्तीक समुपदेशन करण्यात येत आहे. समाजाचे दंत आरोग्य चांगले राहण्यासाठी संवर्धनात्मक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसन दंत आरोग्य चिकित्सेचा पुरेपुर अवलंब करुन समाजोपयोगी उपक्रम व व्यक्तिगत सर्वोत्तम सेवेचा गरजुंना आधार बनणारे हे खात्रीशीर दंत सुपर स्पेशालिटी रूग्णालय असेल, असे सांगून वरील दंत आरोग्य सुविधांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. हनुमंत कराड यांनी शेवटी केले.

———————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]