22.9 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeकृषी*सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते, रेणा...

*सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते, रेणा साखर कारखाना येथे३,२१,५०१ व्या साखर पोत्याचे पूजन*

लातूर (निवाडा) :– ऊसऊत्पादक शेतक-यांच्या कष्टाचे मोल करत त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठीचे केंद्र बिंदू म्हणून ओळखल्या जात असलेल्या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम २०२२-२०२३ मधील उत्पादीत ३,२१,५०१ व्या(५०किलो)पोत्याचे पुजन रेणा कारखाना संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील,रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख,मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विलास कारखाना व्हा चेअरमन रविंद्र काळे,
 संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे,  संचालक सर्वश्री धनराज देशमुख,लालासाहेब चव्हाण,अनिल कुटवाड,संजय हरिदास, संग्राम माटेकर, प्रेमनाथ आकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे, सौ वैशालीताई माने, सौ अमृताताई देशमुख, तक्रार निवारण समितीचे  सदस्य सतीश पाटील, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने,  सतीश पाटील   कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे व खाते प्रमुख यांची उपस्थिती होती.

चालू गळीत हंगामात रेणा कारखान्याने  आज अखेर १,५३,१३० मेट्रीक टनाचे गाळप केले असून,१,६०,६०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. तर ३,२१,५०१ (५०किलो) साखर पोते उत्पादीत केले आहे व १०.७९ एवढा साखर उतारा प्राप्त केला आहे. रेणा साखर कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम हे ९ महिन्यात करणे अपेक्षित असताना केवळ २ महिन्यात हे काम पूर्ण केले आहे.

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सहकार्याने रेणा कारखान्याची वाटचाल सुरू असून चालू गळीत हंगाम हा यशस्वी करून शेतकरी सभासदांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली जाईल असा विश्वास कारखान्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]