आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूर च्या सौन्दर्यात भर – आ प्राणितीताई शिंदे
सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांच्या संकल्पनेतून आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट चे उदघाटन आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीकांचना यन्नम या होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती गटनेते चेतन भाऊ नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,महापालिका उपायुक्त धनराज पांडे साहेब, नगरसेवक नागेश भोगडे, नगर अभियंता संदीप कारंजे , झोन अधिकारी तपन डांके ,युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे,प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवा नेते वाहिद बिजापुरे, राहुल वर्धा, परिवहन सदस्य तिरूपती परकीपंडला, गणेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती..
या वेळी अधिक बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या सोलापूर चे स्वरूप हळूहळू बदलत आहेत या वेळी अशा प्रकारच्या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूरच्या सौन्दर्यात भर पडत आहे. अतिशय वेगळी अशी संकल्पना नगरसेवक विनोद भोसले यांनी सोलापूरची ऐतिहासिक ठेवा असलेली सोलापूर महानगरपालिका वास्तू शेजारी I LOVE SOLAPUR ही सेल्फी पाइंट बनविली आहे. हा सेल्फी पॉईंट भविष्यात सोलापूरच्या नागरिकांचे आकर्षण केंद्र बनेल सध्या सोशल मीडियाचे जग आहे. जगभरात कुठेही एका क्षणात पोहोचण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. नागरिक सोलापूर बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येऊन सेल्फी काढून फेसबुक, व्हॉटसॅप, इन्स्ट्राग्राम इन्ट्राग्राम, ट्विटर वर प्रसारित करून सोलापूरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख देशभरात पोहोचवतील यात कोणतीही शंका वाटत नाही.
यावेळी राजासाब शेख, अमोल भोसले, युवराज जाधव, राज सलगर, प्रवीण जाधव, शाहू सलगर, राहुल गोयल, जावेद कुरेशी, प्रतीक आबुटे, बसु आण्णा कोळी, शरद गुंमटे, सुभाष वाघमारे, बाबुराव शिरसागर, चंद्रकांत पात्रे, दाऊद नदाफ, शिव कलशेट्टी, दीनानाथ शेळके, शिवराज कोरे, संजय गायकवाड, योगेश मार्गम, वेंकटेश बोमेन, नागेश म्याकल, समीर काझी, अमोल माशाळे, राजेंद्र शिरकुल, श्रीकांत वाडेकर, सुनील सारंगी, सचिन शिंदे, मलीनाथ सलगर, कुणाल भाऊ गायकवाड, श्रीकांत गायकवाड, धीरज खंदारे, चंद्रशेखर सरवदे, अमोलभोसले मित्र परिवार अमित राठोड, नितीश पवार, शशांक दांडगे, नंदकुमार शिवगुंडे, प्रवीण कदम व युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.





