23.9 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeशैक्षणिक*सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे*

*सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे*

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी तसा आदेश काढला.
माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार यापूर्वी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे होता. मात्र त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेमध्ये झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. सुमारे दहा दिवस हा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी कोणालाही दिला नाही.

याच दरम्यान माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदावर तृप्ती अंधारे आणि नळे हे दोन नवीन अधिकारी आले. त्यामुळे पदभार द्यायचा कुणाकडे या विचारात प्रशासन होते. शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेण्यात तृप्ती अंधारे यांनी बाजी मारली आहे. मंगळवारी दुपारी स्वामी यांनी अंधारे यांच्या नावाचा आदेश काढून अंधारे यांनी तात्काळ पदभार स्वीकारून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]