स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प वैद्यकीय क्षेत्रातील लातूर पॅटर्न- मा.अमित देशमुख.
लातूर;ता १५; > लोकसहभागातून उभा राहिलेला स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प हा महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील एकमेव प्रकल्प आहे त्यामुळे तो एक लातूर पॅटर्न ठरला आहे. यापुढे कोरोना युद्ध जिंकण्यासाठी शासन, प्रशासन, डाॅक्टर,नागरिक यांची एकजूट आवश्यक आहे असे उदगार स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केल्या नंतर आयोजीत लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री मा.श्री.अमित देशमुख यांनी काढले. हा सोहळा श्री गुरूजी आयटीआय च्या सभागृहात
आयोजीत केला होता. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.अशोक कुकडे, लक्ष्मीरमणजी लाहोटी, महापौर विक्रांत गोजमगुंडे, पोलिस अधिक्षक पृथ्वीराज बी.पी.जेष्ठ बालरोगतज्ञ डाॅ.अशोक अरदवाड, स्पंदनचे प्रमुख डाॅ.विश्वास कुलकर्णी, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,मनपा आयुक्त आमन मित्तल, जि.प.कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती. स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प निर्माण करताना ज्याचे सहकार्य लाभले ते राहुल इगे,बसवेश्वर थलकरी व रवि ढोले अतुल ठोंबरे ,निता कानडे, साक्षि कुलकर्णीचा, डाॅ.अनघा राजपूत, डाॅ.संतोष कुलकर्णी, देशमुख, विनय दिक्षित,संजय प्र अयाचित,अविनाश पाटील, संतोष कुलकर्णी, सुनिल देशपांडे, सोमनाथ हुमनाबादे,भूषण दाते, दत्ता शिंदे अमोल बनाले यांचा यावेळी पालक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डाॅ.विश्वास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले,महापौर विक्रांत गोजमगुंडे व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी मनोगत व्यक्त केली.पद्मभूषण अशोक कुकडे यांनी अध्यक्षीय समारोप केला,

डाॅ.अनुजा कुलकर्णी यांनी सरस्वती स्तवन व पसायदान सादर केले, डाॅ.मुकुंद भिसे यांनी सुत्रसंचलन तर अतुल ठोंबरे यांनी आभार व्यक्त केले.











