मुंबई, : प्रतिनिधी
सा. विवेक प्रकाशित ‘हिंदुत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन 30 मार्च रोजी सायंकाळी 6.00 वा. प्रभादेवी येथील
रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.
ग्रंथाचे प्रकाशन रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य मा. भय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बाल विकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा आणि इस्कॉनचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णचैतन्य दास या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
तसेच एबीएम नॉलेजवेअर लि.चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रकाश राणे आणि एस.एस. हायस्कूल, नवी मुंबईचे अध्यक्ष मा. कमलेश पटेल यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सांप्रत काळ हा हिंदुत्वाचा आहे आणि म्हणूनच हिंदुत्वाचा आशय समजून घ्यायला हवा. हिंदुत्वाच्या विविध आयामांची आधुनिक परिपेक्ष्यात मांडणी करणारा हा ‘हिंदुत्व’ ग्रंथ आहे.
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात रविवारच्या अंकात बातमीचा आणि 30 मार्चला आजच्या कार्यक्रमात बातमीचा समावेश असावा. कार्यक्रमासाठी आपल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला व छायाचित्रकाराला प्रकाशन कार्यक्रमाला पाठवून यथोचित प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.




