26.3 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeठळक बातम्या*हेमलता शहरकर यांचे निधन*

*हेमलता शहरकर यांचे निधन*

लातूर -निवृत्त शिक्षिका व नारी प्रबोधन मंचच्या माजी अध्यक्षा,ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. हेमलता जीवनधर शहरकर यांचे दिनांक 04-11-2022 रोजी वार शुक्रवार मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे. सतत हसतमुख आणि कार्यरत व्यक्तिमत्त्वाच्या, त्यांच्या गोड गळ्यातून अनेक गाणी, प्रेरणा गीते, कविता तोंडपाठ ऐकल्या होत्या. जीवनधर शहरकर सरांकडे केव्हाही गेले की आदरतिथ्याने भारावून टाकत असत.नवखा माणूस जरी त्यांच्याकडे कधी गेला तर अगदी जुनी ओळख असल्यासारखे विचारपूस करत,हसत चौकशी करत असत.मी सरांकडे अनेकदा गेलो त्या सर्व वेळेस या वयातही त्यांनी कधीच पाहुनचाराशिवाय येवूच दिले नाही. सरांइतकाच अनेक जून्या आठवणी त्यांच्या कडे होत्या.हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांच्या ही आठवणी व कार्य धाडसाचे आहे. आदरणीय सौ शहरकर आई म्हणजे, एक कार्यशील शिक्षिका,धाडसी कार्यकर्त्या, समर्पित वृत्ती, सामाजिक कार्यकर्ती व कुटुंब वत्सल आई व सेवाभावी पत्नीभावाला आज विराम मिळाला आहे.


विनम्र आदरांजली…
अंत्यदर्शन वेळ दिनांक 4 -11- 2022 दुपारी 1.30 वाजेपर्यंत राहते घर “मित्र छाया” खोरी गल्ली आंबेजोगाई रोड, लातूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]