संदीप काळे यांची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद
मराठवाड्याच्या सुपुत्राची देशाच्या इतिहासात दखल
मुंबई (प्रतिनिधी) : लेखक, संघटक, निवेदक आणि संपादक असणाऱ्या संदीप काळे यांच्या कार्याची ‘इंडिया बुक रेकार्ड’ मध्ये सामाजिक क्षेत्रात लेखन करणारा आघाडीचा संपादक म्हणून नोंद झाली आहे. ‘इंडिया बुक रेकार्ड’ देशाचा इतिहास लिहिण्याचे काम करते. या इतिहासात मराठवाड्याचे सुपुत्र संदीप काळे यांची नोंद झाल्यामुळे त्यांचे सर्व ठिकाणावरून अभिनंदन होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील पाटनूर या गावी संदीप काळे यांचा जन्म झाला. रामराव आपाराव काळे हे संदीप काळे यांचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना संदीप यांनी अनेक क्षेत्रांत आपला इतिहास निर्माण केला आहे. निर्मल, मराठवाडा, अनुप, सृजन, कमल, राजन, ग्रंथाली, सकाळ अशा अनेकप्रकाशनांननी संदीप काळे यांची आजपर्यंत ६१ पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या
मूलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून संदीप काळे यांनी देशभर मोठे नेटवर्क उभे केले आहे. अनेक टीव्ही, वर्तमानपत्र, यांच्या माध्यमातून संदीप यांनी केलेले शो, सतत लिहिलेले सदर नक्कीच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे होते.
संदीप काळे यांचे सामाजिक आणि संवेदनशील लिखाण
याची ‘इंडिया बुक रेकार्ड’ मध्ये नोंद झाली. पत्रकारितेत नियमित लिखाण, नियमित सामाजिक प्रश्नांवर भाष्य, त्यातून अनेकांना मदत, चांगल्या व्यक्तींना सतत प्रकाशझोतात आणणे अशा अनेक स्वरूपाचे रेकार्ड संदीप काळे यांच्या नावे झाले आहेत. अनेक वर्तमानपत्र, टीव्ही यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी, पदावर काम करणारे संदीप काळे सध्या एका आघाडीच्या दैनिकात काम करीत आहेत. संदीप काळे यांनी मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळ:
संदीप काळे यांना ‘इंडिया बुक रेकार्ड’ या देशपातळीवरील नोंद करणाऱ्या संस्थेनेसन्मानपत्र, गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले आहे.




