आ अभिमन्यू पवार यांच्या हस्ते फत्तेपूर स्वतंत्र सहकारी संस्थेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
शेतकरी आणि सभासदांची कामे अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास केला व्यक्त
औसा : जागतिक सहकार दिनानिमित्त औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या नव्या कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ अभिमन्यू पवार यांनी फत्तेपूर ग्रामस्थांची स्वतंत्र सहकारी सोसायटी असावी, ही अनेक वर्षांपासूनची प्रामाणिक मागणी आज पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी गाव दुसऱ्या गावातील सहकारी संस्थेशी संलग्न असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आता स्वतंत्र सहकारी संस्था सुरू झाल्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच शेतकरी आणि सभासदांची कामे अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत, नव्या कार्यालयाच्या माध्यमातून फत्तेपूर व परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास अध्यक्ष व्यंकटराव पाटील, प्रविण फडणीस, औसा सहनिबंधक रमेश सगर, सहकार अधिकारी व्ही. एम. बोरफळकर, मारुती महाराज का. संचालक शामराव पाटील, सुभाषराव जाधव, औसा पंचायत समिती सदस्या सुकेशना श्रीधर पाटील, फत्तेपूरच्या सरपंच अनिता बलभीम माळी, सोसायटीचे चेअरमन ज्योतिराम साळुंखे, उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव बलभीम एकंडे, माजी उपाध्यक्ष श्रीराम पाटील, नागरसोगाचे चेअरमन यशवंत शिंदे, शिरोडकर जाधव, सदाशिव जोगदंड, विश्वंभर धानूरे, चतुर्भुज जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर फत्तेपूर येथील श्री नरसिंह मंदिरास भेट देऊन दर्शन घेत मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मंदिर परिसरात सभागृह उभारण्यासाठी मूलभूत सुविधा (२५/१५) योजना निधीतून सुमारे ३० लाख रुपयांच्या कामास दोन टप्प्यांत मंजुरी देण्यात आली असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.यावेळी श्री नरसिंह देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. या दर्जामुळे तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिर परिसरातील उर्वरित विकासकामे आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




