36.8 C
Pune
Friday, May 22, 2026
Home दिन विशेष *प्रा. उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन*

*प्रा. उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन*

0
323

श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तसेच रिलायन्स लातूर पॅटर्न चे संचालक  प्रा. उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी 7 ते 10 या वेळेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग छत्रपती चौक ते 5 नंबर चौक, लातूर हा होता. या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर 4.5 KM एवढे आहे. 

या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात प्राध्यापक उमाकांत होनराव सर यांच्या हस्ते करण्यात आली व स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धकांचा पारितोषक देऊन सन्मान करण्यात आला. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी मा. श्री ओंकार होनराव यांनी सर्व स्पर्धकांचे,आयोजकांचे तसेच सर्व पोलीस बांधवांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव यांनी पोलीस भरतीसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या व आयोजकांनी अशीच मॅरेथॉन स्पर्धा समस्त लातूरकरांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येईल अशी घोषणा केली.

तसेच अनाथालय व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले  तदनंतर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेमध्ये श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन मा. श्री खासदार सुधाकरराव शृंगारे साहेब आणि मा. माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.  या शिबिरामध्ये श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता..

  प्रा. उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला त्यावेळी संस्थाध्यक्ष  प्रा. उमाकांत होनराव यांनी आपले मनोगत, “जीवनपटाच्या रुपेरी पडद्यावर भूमिका बजावताना व्यक्तींची होणारी कसरत ही त्याच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाबरोबरच सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे ऋण फेडण्यासाठी तत्पर असावे. संस्कृतीची शिकवण जबाबदारीने आणि सार्थपणे पार पाडण्याची कला प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करावी” असे व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी संस्थेच्या सचिव तथा  महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुलक्षणा केवळराम यांनी मॅरेथॉन स्पर्धा, अनाथालय व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे वाटप व रक्तदान या कार्यक्रमांच्या आयोजकांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]