27.4 C
Pune
Saturday, October 3, 2026
Home ठळक बातम्या प्रा ‌‌महेश मोटे यांचा सत्कार

प्रा ‌‌महेश मोटे यांचा सत्कार

0
566

बहुजन ट्रस्ट, पुणे व सिध्दार्थ कॉलनीकडून डी. लीट पदवी मिळाल्याबद्ल प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सत्कार  

मुरुम, ता. उमरगा, ता. १९ (प्रतिनिधी) : पुणे येथील बहुजन ट्रस्ट व मुरुमच्या सिध्दार्थ कॉलनीच्या संयुक्त विद्यमाने सिध्दार्थ कॉलनीत बुधवारी (ता. १८) रोजी अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीने सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डी. लीट. पदवी प्रदान केल्याबद्ल प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धम्ममित्र राम कांबळे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सुनीता कांबळे, धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी आर्यघोष, अमर कांबळे, बळीराम भालेराव, प्रज्वल कांबळे, सुनिल भालेराव, अभिजीत कांबळे, मनोज हावळे, गौरव कांबळे, शिवाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील सिध्दार्थ कॉलनीत डी. लीट. पदवी मिळाल्याबद्ल प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सत्कार करताना धम्ममित्र राम कांबळे, सुनिता कांबळे, धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी आर्यघोष, सुनिल भालेराव, अमर भालेराव  व अन्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]