Homeराजकीयसंतोष सोमवंशी यांचा ठाकरेंना जयमहाराष्ट्र

संतोष सोमवंशी यांचा ठाकरेंना जयमहाराष्ट्र

उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा सेनेला जय महाराष्ट्र!*

*एकनाथ शिंदेची धरली साथ*

लातूर ;( माध्यम वृत्तसेवा )-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे .संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला .

लातूर जिल्ह्याचे प्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता .गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला . आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठा धक्का मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे बोलले जात आहे.

संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत .अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे . औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी चांगले काम केले होते. अशा एका उमद्या ,तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट मुकला आहे ,अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments