32.9 C
Pune
Friday, May 22, 2026
Home महत्त्वाच्या घडामोडी उद्यापासून किल्लारीत मोरारी बापू यांची राम कथा

उद्यापासून किल्लारीत मोरारी बापू यांची राम कथा

0
3

किल्लारीत राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन

लातूर, दि. २२( माध्यम वृत्तसेवा):- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजे 23 ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये किल्लारी साखर कारखानाच्या परिसरात उभा करण्यात आलेल्या भव्य कथा मंडपात ही राम कथा होत आहे.

धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात सुरू झालेल्या या रामकथेसाठी राज्यासह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे.रामकथेच्या माध्यमातून मोरारी बापू रामचरित्र, मानवता, प्रेम, सद्भावना आणि सामाजिक मूल्यांवर मार्गदर्शन करत आहेत. दररोज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.किल्लारी परिसरात या रामकथेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, निवास, वाहतूक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनाकडून वाहतूक आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.रामकथा सोहळ्यामुळे किल्लारी परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक बळकट झाले असून पुढील काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोरारी बापूंच्या राम कथा कार्यक्रमाच्या अनुषंगाने कथा मंडपास प्रत्यक्ष भेट देऊन नियोजनाची पाहणी केली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]