24.7 C
Pune
Sunday, August 9, 2026
Home महाराष्ट्र गणेश रामदासी यांचा नागरी सत्कार

गणेश रामदासी यांचा नागरी सत्कार

0
494

गणेश रामदासी यांचा नागरी सत्कार

निलंगा तालुका पत्रकार संघ, निलंगा नगरपरिषद यांच्या पुढाकाराने व अक्का फाउंडेशनच्या वतीने निलंग्याचे भूमिपुत्र .गणेश रामदासी यांची महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.अशोक पाटील निलंगेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रदीप नणंदकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे श्री.नरसिंह घोणे, श्री.जयप्रकाश दगडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव श्री.अरविंद पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी श्री.विकास माने, डॉ.श्री.हंसराज बाहेती, श्री.विलास सूर्यवंशी, निलंगा तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.राम काळगे, पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, श्री.अंकूश ढेरे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, गटविकास अधिकारी श्री.अमोल ताकभाते यांच्यासमवेत ऑनलाईन माध्यमातून निरुपणकार व ज्येष्ठ पत्रकार .विवेक घळसासी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व महासंचालनालयाचे संचालक म्हणून .गणेश रामदासी यांची झालेली निवड ही संपूर्ण निलंगा वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यातून निलंग्याची शान, मान आणि गौरव वृद्धिंगत होणार आहे यात शंका नाही. तसेच त्यांच्या माध्यमातून अनेक पत्रकारांच्या समस्या मार्गी लागेल, असा विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]