Homeशैक्षणिकडॉ. संदीपान जगदाळे यांना ‘गुरुजन गौरव’प्रदान

डॉ. संदीपान जगदाळे यांना ‘गुरुजन गौरव’प्रदान

प्रयोगशील अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास; डॉ. संदीपान जगदाळे यांना ‘गुरुजन गौरव’

लातूर दि. ३१ शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच प्रयोगशील व विद्यार्थी-केंद्रित अध्यापनाची प्रभावी दखल घेत दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांना वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय ‘गुरुजन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वृंदावन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित २१ व्या राज्यस्तरीय ‘गुरुजन गौरव’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सजगता, संस्कार, सामाजिक भान आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो.

डॉ. जगदाळे यांनी शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पंढरपूर येथील महंत विश्वविख्यातधामपीठ कैकाडी महाराज मठाचे परमपूज्य ह.भ.प. भारत महाराज जाधव यांच्या शुभहस्ते डॉ. जगदाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील, सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संत चोखामेळा आरोग्य केंद्र, चाऱ्होली फाटा, आळंदी येथे संपन्न झालेल्या या गुरुजन गौरव सोहळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकातील एकूण ११ गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. संदीपान जगदाळे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शाह, सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित आणि अधीक्षक संजय व्यास यांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments