*पदयात्रेची सांगता*

0
354

अतिवृृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ‘ आई तुळजाभवानी ‘सरकारला सुबुध्दी दे.- आ.अभिमन्यु पवार यांच्या औसा-तुळजापूर पदयाञेची सांगता..

तब्बल 57 कि.मी.पदयाञेमुळे आ.अभिमन्यु पवार हे ऊर्जास्ञोत…

औसा-( प्रतिनिधी) आ. अभिमन्यू पवार यांच्या दि.16 ते 18 आँक्टोबर दरम्यान पदयाञेची सांगता झाली.त्यात त्यांनी तब्बल 57 किलोमीटरच्या या पदयात्रेनंतर आ. अभिमन्यू पवार यांनी सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेत तुळजाभवानी च्या चरणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता, 2019 प्रमाणे नुकसानभरपाई देण्याची सद्बुद्धी आणि विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य सरकारला दे हे साकडं घातले.

यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी एका निवेदनाद्वारे आई, तू जाणतेसच की अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या अतिवृष्टीत नुसतं हातचं पीक गेलेलं नाही तर हेक्टरो जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतातली नुसती माती वाहून गेलेली नाही आई, तर शेतकऱ्यांची स्वप्नं वाहून गेली आहेत. एकएका जिल्ह्यात 4 लाख हेक्टर वरचं नुकसान झालंय आई पण मायबाप सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्यापैकी एकालाही मराठवाड्यात यावं, जगाच्या पालनकर्त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हाथ ठेऊन ‘काळजी नका करू, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी’ हे एक वाक्य बोलून धीर द्यावा अशी इच्छा झालेली नाही.त्यांच्या घरी बसून त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती कशी कळेल? आई तुला हाथ जोडून कळकळीची विनंती आहे, सरकारच्या बधिर झालेल्या संवेदना जाग्या कर, चिखल झालेल्या शेतात नका येईनात पण किमान एका गावात येऊन एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याला आधार देण्याची तरी सद्बुद्धी त्यांना दे.शेतकऱ्यांचं खूप काही मागणं नाही आई, 2019 मध्ये कोल्हापूर-सांगलीत पूर आल्यानंतर तत्कालीन सरकारनं ज्या निकषांप्रमाणे नुकसानभरपाई दिली होती त्याच निकषांप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. मागच्या वर्षी नुकसान होऊनही पीकविमा मिळाला नाही. यावर्षी पुन्हा नुकसान झाल्यानंतर नियमाप्रमाणे 25% आगाऊ विमा द्या म्हणलं तर तेही नाही. सरकार कागदोपत्री आदेश काढत आणि आणि विमा कंपन्या त्या आदेशांना केराची टोपली दाखवतात. विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत कारण सरकारला शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यापेक्षा विमा कंपनीच्या नफ्यात हिस्सेदारी मिळवण्यात अधिक रस आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी हाव नियंत्रणात ठेवण्याचे सामर्थ्य या सरकारला दे आई असे साकडे घातले आहे.

आई तुळजाभवानीस ,सरकारनं सक्तीची वीजबिल वसुली चालवली आहे. आता शेतात काही पिकलेलंच नाही तर शेतकऱ्यांनी काय शेत विकून बिल भरावं का? शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्याची संवेदनशीलता सरकारला दे. आज जे सरकारमध्ये आहेत त्यांनी सरकारमध्ये नसताना बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार हेक्टरी 01 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. सत्तेच्या धुंदीत असेल किंवा कामाच्या व्यापात असेल पण त्यांना त्यांच्याच मागणीचे विस्मरण झाले आहे. आई, शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी दिलेल्या शब्दाचे त्यांना स्मरण करून दे…2 लाखांपेक्षा अधिक पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अंशतः कर्जमाफी देण्याची आणि चालू बाकी कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा या सरकारने केली होती आई, या घोषणेचेही स्मरण सरकारमध्ये बसलेल्या तुझ्या लेकरांना करून दे.सगळ्यांना निवेदनं देऊन झाली पण ते ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. म्हणून तुलाच साकडं घालत आहोत.

आशा आशयाचे निवेदन तुळजापूर येथील तुळजाभवानी च्या चरणी दिले आहे. यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड, नितिन काळे,संताजी चालुक्य,सौ.शोभाताई अभिमन्यू पवार, सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, सुनील उटगे,किरण उटगे, प्रा.भिमाशंकर राचट्टे, लहू कांबळे, अजित माने, ज्ञानेश्वर वाकडे,महेश पाटील, भागवत कांबळे, दिपक चाबुकस्वार,काकासाहेब मोरे,गोपाळ धानूरे, समीर डेंग, संजय कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, नितिन पाटील, जिलानी बागवान, राम माने, जगदिश परदेशी, धनंजय परसणे,अॅड पाडुरंग शिवलीकर, रविशंकर केंद्रे, दत्ता चेवले, पप्पूभाई शेख,शिव मुरगे,धनराज काजळे, राजकिरण साठे, फहिम शेख, तुराब देशमुख, किशोर इरपे, कल्पना ढविले, कविता गोरे ,कल्पना डांंगे, सोनाली गुळबिले,सोनाली पाटील, सुकेशनी जाधव,आश्विनी घाडगे, स्वाती जाधव, सुनिता सूर्यवंशी माधुरी पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here