*चेअरमनपदी धिरज देशमुख, तर व्हाइस चेअरमन म्हणून अविनाश जाधव यांची बिनविरोध निवड*
*नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन निवडीनंतर परिसरात फटाक्यांची आतषबाजी*
लातूर दि. २५.लातूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणा-या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची २५ नोव्हेंबर रोजी सलग दुस-यांदा बिनविरोध निवड झाली असून बँकेच्या उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीमुळे लातूरच्या सहकार क्षेत्रात माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख, बँकेचे विद्यमान चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

याबाबत आज बुधवारी सकाळी ११ वाजता बँकेच्या संचालक मंडळ सभागृहात बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी श्री नेटके व सहाय्यक निवडणूक अधिकारी जिल्हा उपनिबंधक पोतलंगे यांच्याकडे चेअरमन पदासाठी धीरज विलासराव देशमुख व व्हाइस चेअरमन पदासाठी अविनाश बाळासाहेब जाधव यांनी नामनिर्देशन फॉर्म दाखल केले दोन्ही पदांसाठी एकेक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली निवड झाल्यावर सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन चेअरमन धीरज देशमुख व व्हाइस चेअरमन अविनाश जाधव यांच्या निवडीचे सर्व संचालक मंडळानी अभिनंदन केले
*सहकार महर्षी दिलीपराव देशमुख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नूतन जिल्हा बँकेचे चेअरमन व व्हाइस चेअरमन बँकेत केला सत्कार*

बुधवारी जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख व्हाइस चेअरमन अविनाश बाळासाहेब जाधव यांची निवड होताच सहकार महर्षी दिलीपराव देशमुख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून नवनिर्वाचित चेअरमन धीरज विलासराव देशमुख व व्हाइस चेअरमन अविनाश बाळासाहेब जाधव यांच्या निवडीबद्दल बँकेच्या मुख्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पुढील कार्यास शुभेछा दिल्या
*सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने बँकेच्या परंपरेनुसार बिनविरोध निवडी*
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने विरोधकांच्या ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत बहुमत मिळवले होते. आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी पार पडलेल्या विशेष सभेत इतर कोणाचाही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी धिरज देशमुख आणि अविनाश जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. निवड जाहीर होताच बँक परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला
*दुसऱ्यांना धीरज देशमुख यांना चेअरमनपदाची संधी*

यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये धिरज देशमुख यांची या बँकेच्या अध्यक्षपदी प्रथमच बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारत आपली छाप पाडली होती. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बँकेचा कारभार पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख ठेवण्यावर भर दिला त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आधुनिक बँकिंग सेवा पोहोचवण्यात मोठे यश मिळवले आहे. विशेषत: शेतक-यांना पीक विमा परताव्याचे वेळेत वितरण करणे, ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्यांचे निवृत्तीवेतन थेट खात्यात जमा करणे आणि ग्रामीण भागात २४ तास एटीएम सुविधेसोबतच ‘मोबाईल एटीएम व्हॅन’ अर्थात फिरती बँक शाखा सुरू करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासद यांनी सहकार यांनी सहकार पॅनल च्या उमेदवारांना आशीर्वाद दिला आहे अशी चर्चा आज निवडीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकरी सभासद यांच्यात सुरू होती .
जिल्हा बँकेच्या मुख्यालयात निवडीच्या वेळी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख व्हाइस चेअरमन अविनाश बाळासाहेब जाधव संचालक हेमंत जाधव संचालक भगवानराव पाटील तळेगावकर,संचालक अरविंद पाटील,संचालक अतुल गंभीरे संचालक आशिष राजुरकर,संचालक संतोष पाटील संचालक जगन्नाथ पाटील ,संचालक सर्जेराव मोरे, संचालक ऋषिकेश कराड,संचालक चंद्रशेखर दंडीमे,संचालक जयेश माने संचालक सौ प्रीती भोसले सौ शीतल पाटील, सौ गीतांजली लांडगे संचालक अँड शेषराव हाके संचालक विवेक शिरसाठ उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री पोतंगळे सहाय्यक निवडणूक अधिकारी गाडेकर यांनी परिश्रम घेतले.

बँकेच्या मुख्यालयात नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांच्या निवडीनंतर नागरिकांचा कौतुकाचा वर्षावबुधवारी जिल्हा बँकेच्या निवडी नंतर चेअरमन धीरज विलासराव देशमुख व्हाइस चेअरमन अविनाश बाळासाहेब जाधव यांची निवड होताच जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यांनतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चेअरमन धीरज देशमुख व्हाइस चेअरमन अविनाश जाधव यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख अँड किरण जाधव, अँड प्रमोद जाधव शाम भोसले विजय देशमुख शिवानंद हेंगणे सूरज पाटील यांच्या सह मांजरा परिवारावरील संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..




