30.4 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home महत्त्वाच्या घडामोडी वाढदिवसानिमित्त संकल्प

वाढदिवसानिमित्त संकल्प

0
583

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणार डॉ. जगदाळे

-वाढदिवसानिमित्य संकल्प

ला.दि.16 कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले आहे असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ संदीपान जगदाळे यांनी अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा संकल्प आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांचे छत्र हरवले आहे असे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत. त्यांचे मनोबल उंचवावे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे या उदात्त हेतूने डॉ.जगदाळे यांनी त्या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे अशा विद्यार्थ्यांनी दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथे इयत्ता ११ वी साठी प्रवेश घेतला आहे व प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांची इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वीचे प्रवेश शुल्क,वह्या,पुस्तके,पेन,पेन्सिल इ.शैक्षणिक साहित्य,गणवेश व परीक्षा शुल्क भरून त्याचे शैक्षणिक पालकत्व घेणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले आहे.

या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉ.जगदाळे यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, शालेय समितीचे अध्यक्ष ललीतभाई शहा,प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे,कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]